जर कोणी साथ सोडली
तर एकटे वाटायला लागते,
गर्दीत असून सुद्धा
एकटेपण जाणवायला लागते..
अचानक कोणी लांब जाता
आपण काय करावे?
दिशा धुरकट झाल्यावर.....
पाउल कुठे टाकावे...?
आठवू लागतात ते क्षण
रात्र उराशी चढल्यावर,
उश्याही अपुऱ्या पडतात
डोळे खच्चून भरल्यावर...
प्रवासाचे भान नसते
साथ कोणाची सुटल्यावर,
मग फरक नाही पडत
कितीही गाड्या चुकल्यावर...
No comments:
Post a Comment