बाबा ss मला जगू दे ना रे..
बाबा,माझं काय चुकलं रे
निष्पाप जीव का मारता रे
जगण्या आधीच तोडता रे
सुंदर जग पाहू तर दे ना रे
बाबा sssss मला जगू दे ना रे.......
तुझा अंश संपवू नका रे
मुलगा मुलगी भेद का रे
माझ्यात कमीपणा नाही रे
मुलासारखे कर्तुत्व करेन रे
बाबा sssss मला जगू दे ना रे.......
चार महिने आधीच टेस्ट रे
निदान "मुलगी" नाराज कारे
भविष्य उज्वल करीन मी रे
अस्तित्व माझे कुचलू नका रे
बाबा sssss मला जगू दे ना रे.......
देशात आज आरक्षण ५० % रे
भ्रूण हत्या महा-अपराध रे
पोटच्या गोळ्यास चिरडू नका रे
हे "देवाचे" विश्व मला पाहू द्या रे
बाबा sssss मला जगू दे ना रे.......
No comments:
Post a Comment