Thursday, September 22, 2011

तु दुर जाताना..

तुटलेली नाती आता..
पुन्हा जोडायची आहेत...
पुढच्या पावलावर..
पुन्हा नवी नाती जोडायची आहेत



निवडूंगाला काटे असतात..
म्हणून ते जगणे सोडत नाही..
ऊन वारा पावसात ते..
मोडून पडत नाही...



अंधारली रात्र आता..
झोपले सारे साथी..
माझे डोळे उघडे अजुन ही..
फ़क्त तुझ्या साठी..



तु दुर जाताना..
माझे डोळे वाहत होते...
तू सोबत असताना जे..
फ़क्त भरुन आले होते..


तुच तर धरलास हात...
अन दाखवलास जिवनाचा मार्ग...
मी तुझ्या मागुनच चालत राहिलो..
पण तू अर्ध्यावरच गाठलास स्वर्ग..

No comments:

Post a Comment