तुझे आयुष्यात येणे
भासते नक्षत्रांचे देणे
चंद्रासोबत तारकांनीही
ऐकले माझे गाऱ्हाणे..!!
तुझे आयुष्यात येणे
इच्छित प्राप्त होणे
उभ्या जन्माचं स्वप्न
हट्टाने फळाला येणे..!!
तुझे आयुष्यात येणे
असेल पूर्वजन्म पुण्याईने
तुझ्या भावूक नजरेतून
जन्मोजन्मीचे संकेत मिळणे..!!
तुझे आयुष्यात येणे
मनोकामना पूर्ण होणे
दृढ इच्छा ज्याची
तोच वर प्राप्त होणे..!!
तुझे आयुष्यात येणे
वयाच्या इशाऱ्याने
तरुणपनाच्या उंबरठ्यावर
तुझी गरज भासणे..!!
तुझे आयुष्यात येणे
कळीचे फूल होणे
मिटल्या सुगंधाला
मुक्त ओंजळ लाभणे..!!
तुझे आयुष्यात येणे
माझ्या बाप्पाच्या कृपेने
पायावर वाहिलेल्या नवसाचे
कृपादृष्टीत पारणे फिटणे..!!
No comments:
Post a Comment