दिलखेच अदा तिची, सैरभैर माझी स्थिती,
एकदा तरी तू पटावीस, धडपड माझी सततची...
तुझ्या नयनीचे चांदणे, त्या चांदण्यात न्हाहून मी,
तयार असे हा दिवाना तुझा..---सप्तपदिंसाठी...||१||
ऐक ना तू एकदा, तुझ्यासाठीच्या सवेंदना,
हाक दे, भेट दे एकदा तरी ह्या साजणा...||धृ||
दूर तू गेलीस कि इथे स्पंदने माझी थांबती..
जवळ तू आलीस कि वेळ ती स्तब्ध होई....
अत्तरे अनेक जरी, तुझा गंध फक्त- कसली मग ती कस्तुरी...
का असे अवघड प्रेम हे, उत्तरे त्यांची मी शोधिसी..||२||
ऐक ना तू एकदा, तुझ्यासाठीच्या सवेंदना,
हाक दे, भेट दे एकदा तरी ह्या साजणा... ||धृ||
दिले हे तुला जीवन माझे, अर्पिले सगळे जे आहे थोडे,
बांधुनी आपले घट्ट नाते, दे मला तुझे प्रेम दे....
ये ना सखे, मज आलिंगन दे,
तुझे सौंदर्य पिण्याकरिता जो चातक मी- मला एक जरी तो थेंब दे...||३||
ऐक ना तू एकदा, तुझ्यासाठीच्या सवेंदना,
हाक दे, भेट दे एकदा तरी ह्या साजणा... ||धृ
No comments:
Post a Comment