लिहिले किती फलक तू
तुझ्या मोतियाच्या अक्षरी
बोल थोर ते जयांचे
आणिले त्यासी तू दारी
दानात दान श्रेष्ठ ते
रक्तदान या भूवरी
केलीस तू सुवर्णजयंती
दानाची या आजवरी
घेतले बोध कितीकांनी
सद्विचार मनी बहु धरी
जगले कितीक रुग्ण ते
तुझ्या रक्ताच्या थेंबावरी
धन्य तुझी ही निष्ठा
बांधिलकी समाजापरी
आठवेल पहाता फलक
आता तू चाललास तरी
घेशील वाहून पुन्हा तू
नव्याच कुण्या कार्यावरी
कृपा राहो अशीच प्रभूची
सदा राजेंद्रा तुजवरी
No comments:
Post a Comment