त्या आठवणी......
सखे मी प्रयत्न खूप केले,
यश कधीच नाही लाभले.
कायमचं विसरून जाणे,
मज कधीच नाही जमले.
सखे खूप अशक्य आहे ग,
तुजला मनातून दूर लोटणे.
जणू माझ्या या श्वासानीच,
बंद करावे आज श्वास घेणे.
कधी विसरू नाही शकणार,
या सहवासातल्या क्षणांना.
जाग्या होतात त्या आठवणी,
मी एकांतात कुरवाळताना.
No comments:
Post a Comment