रंग उडालेले आयुष्य माझं...
तु पुन्हा रंग भरशील का.?
त्या साठी तरी निदान..
तू पुन्हा येशील का..?
सरली ती वेळ..
पुढे सरकला काळ..
प्रत्येक रात्री मागुन..
उजाडते रोज नवी सकाळ...
नात्याला आजमावताना...
अविश्वासाने साधला डाव...
तुझ्या माझ्या नात्यावर..
मारला एकच घाव..
तुझ्यावरचं माझं प्रेम...
ओठांनी जरी सांगत नसलो...
त्याच प्रेमापायी मी...
या शब्दांच्या जाळ्यात फसलो...
आज माझ्या शब्दांना..
बघ कशी मिळाली चालना..
मी रोजच बोलतो गं...
आज तू काही बोलना..
No comments:
Post a Comment