Thursday, August 23, 2012

कर मला , ती परत ,माझी कविता

वेदनांचे बारसे झालेच नाही...
दु:ख माझे अजुनी व्यालेच नाही...

हुंदक्यांची मागणी,पूरऊ कशी?...
आसवांचे मोर्चे निघालेच नाही...

तू मला दिलेले,संपले सर्वकाही....
गंध पण श्वासातले,उडालेच नाही...

वाचले तुझे डोळे,ऐकले शब्द हि.....
तुझिया मनातले पण कळालेच नाही...

कर मला , ती परत ,माझी कविता ,
शब्द माझे जे कधी कुरवाळलेच नाही!!!

देईन तुला माझे,सूर्यहि उगवायला....
ये परत मजकडे, जर उजाडलेच नाही....

ग्रंथ त्यांनी तुक्याचे,पाण्यात सोडले...
'अभंग' पण तयाचे बुडालेच नाही....

दारावरीच माझे,लाख सत्कार झाले...
पण 'आत ये' कुणीही म्हणालेच नाही...

थांबलेली ज्यांसाठी,माझी अंतयात्रा...
निरोप आला,ते घरून निघालेच नाही....

No comments:

Post a Comment