Thursday, August 23, 2012

टाळले साऱ्या दिशांनी

टाळले साऱ्या दिशांनी
जाऊ कुठे मी भगवन

दाटला अंधार सारा
पाहू कसे रे भगवन

वेधले दु:खाने इतुके
साहू किती हे भगवन

कुठे दिसेना तुझा ठाव
पाहू किती हे भगवन

दाही दिशा दूर गेल्या
धावू किती हे भगवन

दाखव रे मार्ग तूच आता
तुजविण मज कोण रे भगवन

रंग माझा तुला, गंध माझा तुला

रंग माझा तुला, गंध माझा तुला,
बोल काही तरी, बोल माझ्या फुला
सांग लाजूनही नाव आता तरी
एक खोळंबले गीत माझ्या उरी
अन वसंतास शब्द मी माझा दिला
वेळ जादू भरी ही गुलाबी हवा
ही न मेंदी तुझी रंग माझा नवा
भास झाला खरा, श्वास झाला खुला
हाय माझी-तुझी भेट झाली अशी
शीळ यावी पुढे चांदण्यांची जशी
सांग सोडू कसा हात हातातला
बोल काही तरी बोल माझ्या फुला
आमोल घायाळ

मी तुझ्या प्रेमात पडलेय रे.

पण मला असं का होतेय?
लक्ष लागत नाही, झोप येत नाही,
तुझी नुसती आठवण जरी आली,
तरी गझल ऐकावी वाटते? का?
हे आकर्षण नाही हे तर प्रेम आहे.....
होय हेच मी तुला सांगतेय बुद्धू मी तुझ्या प्रेमात पडलेय रे.

कर मला , ती परत ,माझी कविता

वेदनांचे बारसे झालेच नाही...
दु:ख माझे अजुनी व्यालेच नाही...

हुंदक्यांची मागणी,पूरऊ कशी?...
आसवांचे मोर्चे निघालेच नाही...

तू मला दिलेले,संपले सर्वकाही....
गंध पण श्वासातले,उडालेच नाही...

वाचले तुझे डोळे,ऐकले शब्द हि.....
तुझिया मनातले पण कळालेच नाही...

कर मला , ती परत ,माझी कविता ,
शब्द माझे जे कधी कुरवाळलेच नाही!!!

देईन तुला माझे,सूर्यहि उगवायला....
ये परत मजकडे, जर उजाडलेच नाही....

ग्रंथ त्यांनी तुक्याचे,पाण्यात सोडले...
'अभंग' पण तयाचे बुडालेच नाही....

दारावरीच माझे,लाख सत्कार झाले...
पण 'आत ये' कुणीही म्हणालेच नाही...

थांबलेली ज्यांसाठी,माझी अंतयात्रा...
निरोप आला,ते घरून निघालेच नाही....

क्षण चालले, दिन चालले, अन् चालले आयुष्यही

क्षण चालले, दिन चालले, अन् चालले आयुष्यही
जगणे न हे जगणे मुळी, ना खेदही ना खंतही

आकाश हे माथ्यावरी, आहे जसे, होते तसे
येतात अन् जातातही, घन सावळे, घन शुभ्रही

इतुके कसे हे एकसे , दिसतात सारे सोबती
हे चेहरे आहेत अन् हे चेहरे नाहीतही

या चुंबनातुन कोण ते, तू जहर हे आहे दिले ?
फुलते कसे गाणे पुन्हा, ह्या पोळल्या ओठातही ?

क्षण चालले, दिन चालले.... पण थांबलो मागेच मी
आता नको, ठेऊस तू, मजला तुझ्या स्मरणातही

सुप्रभात.

दंवात चिंब भिजलेली पायाखालची हिरवळ बकुल, जाई,
सोनचाफ्याचा मंद, नाजुक दरवळ इवल्या पाखरांना झुलवणारा
लेकुरवाळा औदुंबर जरतारी शेला पांघरलेला लोभस गुलमोहर
मोती पोवळे प्राजक्त रांगोळी, कोवळं सोनेरी ऊन

रात्रीच्या स्वप्नांचा आस्वाद अजूनही
डोळ्यांच्या कडेवर रेंगाळतोय मन अजूनही त्या प्रदेशातून
बाहेर पडायला कानकुण करतंय रात्रभर उशाशी बसलेला हवाहवासा
अंधार आता रजा घेतोय आणि तेवढीच हवीहवीशी सूर्यकिरणं ...

आमोल घायाळ

आज तुझा वाढदिवस आहे

आज तुझा वाढदिवस आहे,
प्रत्येक श्वास माझा,
देई शुभेच्छा तुला,
कोमेजुनी न कधीही,
जायचे तू फुला, हीच प्रार्थना ईश्वराला....
जरी दूर तू ग तरी न दुरावा,
तुला आठविता तुझा गंध यावा,
सुखाचा तुझा गोड संसार व्हावा,
हीच प्रार्थना

आमोल घायाळ

Wednesday, August 1, 2012

मनात लपलेले गुपित

असे कसे जीवन देवा भलतेच खेळ खेळते, कंटाळून मग माणसाचे लक्ष तुझ्याकडे वळते मनात लपलेले गुपित नेमके पावसालाच कळावे आठवणीच्या या सरीत अश्रूनीच पावूस व्हावे

दानात दान श्रेष्ठ ते

लिहिले किती फलक तू तुझ्या मोतियाच्या अक्षरी बोल थोर ते जयांचे आणिले त्यासी तू दारी दानात दान श्रेष्ठ ते रक्तदान या भूवरी केलीस तू सुवर्णजयंती दानाची या आजवरी घेतले बोध कितीकांनी सद्विचार मनी बहु धरी जगले कितीक रुग्ण ते तुझ्या रक्ताच्या थेंबावरी धन्य तुझी ही निष्ठा बांधिलकी समाजापरी आठवेल पहाता फलक आता तू चाललास तरी घेशील वाहून पुन्हा तू नव्याच कुण्या कार्यावरी कृपा राहो अशीच प्रभूची सदा राजेंद्रा तुजवरी

बहाणे हवे असतात जवळ येण्यासाठी,

मनी भावनांचा कल्ळोळ.. हृदयात सामावली सखी.. अंगणी चांदण्यांचा सडा.. तरी एक चंद्र एकाकी. नात्याला आजमावताना... अविश्वासाने साधला डाव... तुझ्या माझ्या नात्यावर.. मारला एकच घाव.. बहाणे हवे असतात जवळ येण्यासाठी, नाहीतर कारण काय भांडण होण्यासाठी ?? गणेश हसण्यात मजा आहे

जीवघेणा खेळ तुझा लावून जीव गेला

जीवघेणा खेळ तुझा लावून जीव गेला जाणून अमृत लावला ओठी विषाचा पेला रोजचेच सखे तुझं.. वेड्यासारखं असं वागणं.. माझ्यावर रागावून मग.. रात्र रात्र जागणं.. तू सोबत नसलीस.. तुझ्या आठवणी सोबत असतात.. क्षणोक्षणी त्या देखील.. तुलाच शोधत असतात.. माझ्याच सावली ने जेव्हा.. माझी साथ सोडली.. तेव्हाच मला सखे या जगाची रित कळली..

प्रेमाबाद्ल्यात प्रेम मिळो

ठावूक आहे मला तू, माझा कधी होणार नाही ; तुझ्यावर जडलेल्या मनाला आत्ता मी वळवणार नाही प्रेमाबाद्ल्यात प्रेम मिळो नाही कसलीच अपेक्षा जिथे असशील सुखी रहा हीच ईश्वरचरणी इच्चा घायाळ शब्दांनी कधी व्यथा माझी मांडली होती फाटलेल्या कागदावर थोडी शाई त्यांनी हे सांडली होती

ती आली आयुष्यात की

विचार आला मनात झाड लावायला हव, त्यासाठी कोणते तरी कारण मग शोधायला हव. वाढ दिवस ठरला मग पण तो वर्ष्यात एक वेळ, हिशोब करता झाडाचा त्याचा चुकत होता मेळ. मग म्हणल रोजची गोष्ट काय बर असेल, प्रियसीची पहिली भेट छान वेळ ठरेल. ती आली आयुष्यात की अंब्याच झाड आम्ही लावलं, तुटल जेव्हा प्रेम त्यावेळी तिने कडूनिंबाच रोप आणल. अस करत वर्ष्यात एका एक वनराई माझी बनली, पाणी अडून झाडामुळे झरे वाहू लागली. विधान सभेत गेले नाव म्हणे याला पुरस्कार द्यावा, नावासोबत पेपर मध्ये फोटो पण एक हवा. फोटो पाहून पेपर मध्ये पोरी अजून इम्प्रेस मग झाल्या, भेट झाली आमची की आठवणीचे झाड लावू लागल्या. लोक म्हणली मनात मग आईला....हें कारण लई मस्त, रोज रोज नव येत आयुष्यात अस फक्त प्रेमच तर असत....

रंग उडालेले आयुष्य माझं...

रंग उडालेले आयुष्य माझं... तु पुन्हा रंग भरशील का.? त्या साठी तरी निदान.. तू पुन्हा येशील का..? सरली ती वेळ.. पुढे सरकला काळ.. प्रत्येक रात्री मागुन.. उजाडते रोज नवी सकाळ... नात्याला आजमावताना... अविश्वासाने साधला डाव... तुझ्या माझ्या नात्यावर.. मारला एकच घाव.. तुझ्यावरचं माझं प्रेम... ओठांनी जरी सांगत नसलो... त्याच प्रेमापायी मी... या शब्दांच्या जाळ्यात फसलो... आज माझ्या शब्दांना.. बघ कशी मिळाली चालना.. मी रोजच बोलतो गं... आज तू काही बोलना..

त्या आठवणी..

त्या आठवणी...... सखे मी प्रयत्न खूप केले, यश कधीच नाही लाभले. कायमचं विसरून जाणे, मज कधीच नाही जमले. सखे खूप अशक्य आहे ग, तुजला मनातून दूर लोटणे. जणू माझ्या या श्वासानीच, बंद करावे आज श्वास घेणे. कधी विसरू नाही शकणार, या सहवासातल्या क्षणांना. जाग्या होतात त्या आठवणी, मी एकांतात कुरवाळताना.