Monday, May 16, 2011

असं प्रेम करावं...........

प्रेम हि एक सुंदर भावना,
हे सदैव जपाव,
पण त्या बरोबर येणाऱ्या वेदनांना पण,
हसतमुखाने सामोरे जाव.
असं प्रेम करावं.

विरह येतील संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील.
पण आपण मात्र खंभीर रहाव,
प्रत्येक परीक्षा पास व्हाव.
असं प्रेम करावं.

कितीही गेलोत दूर तरीही,
एकमेकांच्या कुशीत असाव.
तिला माझ्या डोळ्यात मला तिच्या डोळ्यात,
एकमेकावरच प्रेम दिसावं.
असं प्रेम करावं.
असं प्रेम कारावं........................

No comments:

Post a Comment