Monday, May 16, 2011

ती म्हणाली काल जेव्हा

ती म्हणाली काल जेव्हा
उगवेल ना पहाट ?
मी म्हणालो साथ देत
शोधू या ही वाट ....

ती म्हणाली काल जेव्हा
चालशील संगतीने ?
मी म्हणालो साथ देण्या
आलोय मी सवडीने


ती म्हणाली काल जेव्हा
दु;खे सारी संगतीला
मी म्हणालो दु;खाविना
अर्थ काय जगण्याला ?

ती म्हणाली काल जेव्हा
कसा होईल संसार ?
मी म्हणालो सोड प्रश्न
येईल प्रेमाचा बहर


--
--
चालणारे दोन पाय किती विसंगत असतात
एक पुढे नि एक पाय मागे
पुढच्याला गर्व नसतो
मागच्याला अभिमान नसतो
कारण त्याला माहित असत
क्षणात हे बदलणार असत
याचंच नाव जीवन असत ....

No comments:

Post a Comment