तुझी आठवण ठरलेलीच....
आणि सांजवेळ तर जीवघेणीच रे, रोजची.
तुझी साथ होती तेव्हा प्रत्येक संध्याकाळ
एखाद्या सणासारखीच खुलायची
तुझं भेटणं,
माझ्यावर प्रेम करणं,
मला समजुन घेणं...
माझे लहान-सहान हट्ट पुरवणं...
माझ्या अल्लडपणात स्वतःला विसरणं....
हे सारं सारं अताशा,
प्रत्येक संध्याकाळी आठवतं मला.
मनात जपलेल्या
याच तुझ्या आठवणींचा भार वाहुन,
आयुष्याची संध्याकाळ जवळ आलीये....
सारं काही संपलंय आता....
तरिही या क्षणाला खुप एकाकी वाटतयं....
आधार हवासा वाटतोय.... तुझा.....
खरंतर,
आधार नकोयं कुस हवीये मायेची.....
थकलेल्या संध्येला काळोखाच्या कुशीत हरवुन जायचयं......
सारी कर्तव्य झाल्यावर आता,
स्वतःसाठी दोन क्षण जगायचयं....
ह्या थकल्या जीवाला
मायेची कुस हवीये आज....
थरथरणार्या हातांना
आधाराचा हात हवाय..
डबडबल्या डोळ्यांना
ओंजळ हवी आहे
No comments:
Post a Comment