एक एक लाट
किनार्याला येऊन भिडते,
वाळूवरती लिहिलेल्या तुझ्या नावाला
ती सहजा सहजी खोडते...
ओल्या ओल्या वाळूवर
शिंपले तुझ्यासाठी सोडते,
मी लिहिलेल्या नावाला
स्वतःच्या नावासोबत जोडते...
भरती आली कि सागराचे पाणी
हळू हळू वाढते,
किनार्यावर बसलेल्या जोडप्यांना घेऊन
साय़ंकाळ त्यांच्या प्रेमासहित बूडते...
नजरेत घेऊन क्षितिजाला
मी लाटांवरती तरंगतो,
पंख पसरवून हातांचे
पक्षी बनून ऊंच ऊंच ऊडतो ...
पून्हा नवे पर्व घेऊन
सकाळ सोनेरी उजाडते ,
पून्हा तुझ्या नावाला खोडण्यासाठी
लाट किनार्याला येऊन भिडते...
No comments:
Post a Comment