Monday, May 16, 2011

असा कोणी असेल का

असा कोणी असेल का?
आयुष्याच्या नवीन वळणावर,
माझा हाथ विश्वासाने पकडणारा,
असा कोणी असेल का?
जीवनाच्या काटेरी रस्त्यावर,
प्रेमाचे फुल पडणारा
असा कोणी असेल का?
पावसात भिजताना ,
पावसातून माझे अश्रू ओळखणारा
असा कोणी असेल का?
माझ्या डोळ्यात पाहून ,
माझे अन्तः करण ओळखणारा
असा कोणी असेल का?
माझ्यातली मी शोधून देणारा,
आणि माझ विश्व होणारा,
असा कोणी असेल का ?
कळत नकळत झालेली माझी चूक,
हक्काने सांगून ती सुध्रावणारा
असा कोणी असेल का ?
मी रडत असताना ,
स्वतः चा खांदा भिजवणारा
असा कोणी असेल का?
आणि आणि मला माझ्या
ह्या स्वप्नातून उठवणारा ,
असा कोणी असेल का ?

No comments:

Post a Comment