Saturday, October 20, 2012

तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन .

अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मा, श्री सद्चीदानंद सद्गुरू साईनाथ महाराज कि जय . तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन . साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // पायी चालत नेलया श्रद्धा सबुरीवाल्याने , साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान , साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // वाट असे ती वळणाची आले पायाला ते फोड , तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटती रे गोड , साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // माझी बाप आणि आई तूच विठ्ठल रखुमाई , तुझ्या शिर्डी नगरात पांढरी ती मी पाहीन , साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // पायी चालत येईन सुख दुख मी सांगीन साई बाबा माझी सारी ती दुख निवारीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन .//२// साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //५ // श्री सद्चीदानंद सद्गुरू साईनाथ महाराज कि जय . आमोल घायाळ १२/१०/२०१२

Thursday, October 11, 2012

मैत्रीण Miscall देऊन वैताग आणणारी, नेहमी Blank Message पाठवणारी , हक्काने जीच्यावर राग व्यक्त करता येईल , वेळ घालवायचा म्हणून फोन करून डोक Out करणारी, मूड ऑफ झाल्यावर फालतू विनोद सांगून पोट दुखेपर्यंत हसवणारी , काही आगळीक घडली तर सणसणीत मुस्कटात ठेवणारी , आपण न सांगताच आपल्या मनातलं ओळखणारी , कोणाच्याही समोर थट्टा केल्यावरन चिडणारी, थोडीशी Short - Tempered , अशीही एखादी मैत्रीण असावी ..

sai baba old photo

sai nath maharaj ki jai

पण तू माझी नाहीये...... एक वेळ होती कि मी रोज नव्या नव्या मुलीच्या प्रेमात पडायचो पण आत्ता कळाले ते प्रेम नसून आकर्षण असायचं आणि आज मला खर खुर प्रेम झालय आकर्षण आणि प्रेम काय असतं ते कळू लागलय आकर्षण आणि प्रेम जरी वेगळे असले तरी प्रेम हे कायमचे आकर्षण असते ते समजू लागलय तूच आहेस आयुष्य माझ मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो हे आत्ता अनुभवलंय ह्यात तुझ काही चुकले नाहीये , मीच चुकतोय हे मला कळतंय पण काय करू ते कळत नाहीये माझ्या आजारावर औषध नाहीये जे औषध आहे ते माझे नाहीये जगायचं पण मरण अनुभवतोय आणि तुझ्या सोबतीची मागणी पण माझी नाहीये मी तर तुझा झालोय पण तू माझी नाहीये मला तुझ उत्तर माहित आहे पण ते उत्तर माझ्या प्रश्नाच समाधान नाहीये तू दुसर्याच्या घरात प्रकाश पसरवशील तुझ्या दिव्याच्या ज्योतीतली एक किरण पण माझी नाहीये तुझ समजावण अगदी बरोबर आहे पण ते समजण्याची समज माझ्यात नाहीये तुझ्या थांबव्ण्याने मी थांबलो नाही आणि आज सहन करण्याची शक्ती पण माझ्यात नाहीये मी तर तुझा झालोय पण तू माझी नाहीये श्री
फुलपाखर सारखं स्वच्छंद असो की परागकण सारखे बंधिस्त दोन्ही आपल्याच भावना त्या कशी लावायची मनाला ह्या शिस्त ? वार्या सारखं खोडकर असो की झऱ्या सारखे अवखळ जगताना आयुष्य हे सदा का नियमांची ठरते अडगळ? कुणी आपल्यावर प्रेम करावं की आपण त्याच्यावर करावं भल्या पहाटेचं स्वप्न ना ते मग का म्हणून ते अपूर्ण ठरावं ???? कळीचं उमलणं असो सये की असो फुलाचं कोमजणं खरचं किती कठीण असतं ना कुणाचं तरी मन समजणं ?.

कधी आठवण आली तर

रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जे बंध जुळतात, त्या "रेशमी" बंधाला "मैञी" म्हणतात... कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस. . जर काही तरी नाही आवडले तर सांगायला उशीर करु नकोस. . कधी भेटशिल तिते एक स्माईलदेउन बोलायला विसरु नकोस. . कधी चुक झाल्यास माफ कर पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस.