Wednesday, August 1, 2012
दानात दान श्रेष्ठ ते
लिहिले किती फलक तू
तुझ्या मोतियाच्या अक्षरी
बोल थोर ते जयांचे
आणिले त्यासी तू दारी
दानात दान श्रेष्ठ ते
रक्तदान या भूवरी
केलीस तू सुवर्णजयंती
दानाची या आजवरी
घेतले बोध कितीकांनी
सद्विचार मनी बहु धरी
जगले कितीक रुग्ण ते
तुझ्या रक्ताच्या थेंबावरी
धन्य तुझी ही निष्ठा
बांधिलकी समाजापरी
आठवेल पहाता फलक
आता तू चाललास तरी
घेशील वाहून पुन्हा तू
नव्याच कुण्या कार्यावरी
कृपा राहो अशीच प्रभूची
सदा राजेंद्रा तुजवरी
बहाणे हवे असतात जवळ येण्यासाठी,
मनी भावनांचा कल्ळोळ..
हृदयात सामावली सखी..
अंगणी चांदण्यांचा सडा..
तरी एक चंद्र एकाकी.
नात्याला आजमावताना...
अविश्वासाने साधला डाव...
तुझ्या माझ्या नात्यावर..
मारला एकच घाव..
बहाणे हवे असतात
जवळ येण्यासाठी,
नाहीतर कारण काय
भांडण होण्यासाठी ??
गणेश हसण्यात मजा आहे
जीवघेणा खेळ तुझा लावून जीव गेला
जीवघेणा खेळ तुझा
लावून जीव गेला
जाणून अमृत लावला
ओठी विषाचा पेला
रोजचेच सखे तुझं..
वेड्यासारखं असं वागणं..
माझ्यावर रागावून मग..
रात्र रात्र जागणं..
तू सोबत नसलीस..
तुझ्या आठवणी सोबत असतात..
क्षणोक्षणी त्या देखील..
तुलाच शोधत असतात..
माझ्याच सावली ने जेव्हा..
माझी साथ सोडली..
तेव्हाच मला सखे
या जगाची रित कळली..
प्रेमाबाद्ल्यात प्रेम मिळो
ठावूक आहे मला तू,
माझा कधी होणार नाही ;
तुझ्यावर जडलेल्या मनाला
आत्ता मी वळवणार नाही
प्रेमाबाद्ल्यात प्रेम मिळो
नाही कसलीच अपेक्षा
जिथे असशील सुखी रहा
हीच ईश्वरचरणी इच्चा
घायाळ शब्दांनी कधी
व्यथा माझी मांडली होती
फाटलेल्या कागदावर थोडी
शाई त्यांनी हे सांडली होती
ती आली आयुष्यात की
विचार आला मनात
झाड लावायला हव,
त्यासाठी कोणते तरी
कारण मग शोधायला हव.
वाढ दिवस ठरला मग
पण तो वर्ष्यात एक वेळ,
हिशोब करता झाडाचा
त्याचा चुकत होता मेळ.
मग म्हणल रोजची
गोष्ट काय बर असेल,
प्रियसीची पहिली भेट
छान वेळ ठरेल.
ती आली आयुष्यात की
अंब्याच झाड आम्ही लावलं,
तुटल जेव्हा प्रेम त्यावेळी
तिने कडूनिंबाच रोप आणल.
अस करत वर्ष्यात एका
एक वनराई माझी बनली,
पाणी अडून झाडामुळे
झरे वाहू लागली.
विधान सभेत गेले नाव
म्हणे याला पुरस्कार द्यावा,
नावासोबत पेपर मध्ये
फोटो पण एक हवा.
फोटो पाहून पेपर मध्ये पोरी
अजून इम्प्रेस मग झाल्या,
भेट झाली आमची की
आठवणीचे झाड लावू लागल्या.
लोक म्हणली मनात मग
आईला....हें कारण लई मस्त,
रोज रोज नव येत आयुष्यात
अस फक्त प्रेमच तर असत....
रंग उडालेले आयुष्य माझं...
रंग उडालेले आयुष्य माझं...
तु पुन्हा रंग भरशील का.?
त्या साठी तरी निदान..
तू पुन्हा येशील का..?
सरली ती वेळ..
पुढे सरकला काळ..
प्रत्येक रात्री मागुन..
उजाडते रोज नवी सकाळ...
नात्याला आजमावताना...
अविश्वासाने साधला डाव...
तुझ्या माझ्या नात्यावर..
मारला एकच घाव..
तुझ्यावरचं माझं प्रेम...
ओठांनी जरी सांगत नसलो...
त्याच प्रेमापायी मी...
या शब्दांच्या जाळ्यात फसलो...
आज माझ्या शब्दांना..
बघ कशी मिळाली चालना..
मी रोजच बोलतो गं...
आज तू काही बोलना..
त्या आठवणी..
त्या आठवणी......
सखे मी प्रयत्न खूप केले,
यश कधीच नाही लाभले.
कायमचं विसरून जाणे,
मज कधीच नाही जमले.
सखे खूप अशक्य आहे ग,
तुजला मनातून दूर लोटणे.
जणू माझ्या या श्वासानीच,
बंद करावे आज श्वास घेणे.
कधी विसरू नाही शकणार,
या सहवासातल्या क्षणांना.
जाग्या होतात त्या आठवणी,
मी एकांतात कुरवाळताना.
Subscribe to:
Posts (Atom)