Wednesday, August 1, 2012

रंग उडालेले आयुष्य माझं...

रंग उडालेले आयुष्य माझं... तु पुन्हा रंग भरशील का.? त्या साठी तरी निदान.. तू पुन्हा येशील का..? सरली ती वेळ.. पुढे सरकला काळ.. प्रत्येक रात्री मागुन.. उजाडते रोज नवी सकाळ... नात्याला आजमावताना... अविश्वासाने साधला डाव... तुझ्या माझ्या नात्यावर.. मारला एकच घाव.. तुझ्यावरचं माझं प्रेम... ओठांनी जरी सांगत नसलो... त्याच प्रेमापायी मी... या शब्दांच्या जाळ्यात फसलो... आज माझ्या शब्दांना.. बघ कशी मिळाली चालना.. मी रोजच बोलतो गं... आज तू काही बोलना..

त्या आठवणी..

त्या आठवणी...... सखे मी प्रयत्न खूप केले, यश कधीच नाही लाभले. कायमचं विसरून जाणे, मज कधीच नाही जमले. सखे खूप अशक्य आहे ग, तुजला मनातून दूर लोटणे. जणू माझ्या या श्वासानीच, बंद करावे आज श्वास घेणे. कधी विसरू नाही शकणार, या सहवासातल्या क्षणांना. जाग्या होतात त्या आठवणी, मी एकांतात कुरवाळताना.

Monday, May 14, 2012

एकदाच मला भेटशील का....थोडं ऐकून घेशील का..

वेळ असेल तुला तर एकदाच मला भेटशील का.... दोन शब्द बोलायचे होते थोडं ऐकून घेशील का...?... पूर्वी तू माझ्याशी खुप काही बोलायचीस वेळ नसला तरी माझ्यासाठी खुप वेळ काढायचीस तासन तास माझ्याशी खुप गप्पा मारायचीस नसले विषय तरी नविन विषय काढायचीस... काही ही बोलूंन मला खुप खुप हसवायचीस माझा फ़ोन एंगेज असला की खुप खुप रागवायचीस आता कशाला आमची गरज पडेल असं म्हणून सारख चिडवायचीस, माझा चेहरा पडला तर खुप नाराज व्हायचीस मग जवळ घेऊन sorry ही म्हणायचीस... आज ही मला तुझा प्रत्येक क्षणी भास होतो का गं अशी वागतेस का देतेस त्रास नाही पुन्हा भेटणार एकदा बंद पडल्यावर माझा श्वास शेवटचं एकदाच भेट मला पुन्हा नाही देणार त्रास... वेळ असेल तुला तर एकदाच मला भेटशील का दोन शब्द बोलायचे होते थोडं ऐकून घेशील का... शेवटचं एकदाच मला भेटशील का....?

प्रेमाचा सुगावा

प्रेमाचा सुगावा पहिल्या प्रेमाचा मज लागला सुगावा सांगा कुणी कांगावा का केला नसावा घास प्रीतीचा कुणीच भरवला नसावा खाल्ल्या मिठाला तो जागला असावा विसावला हि इथंच कुठ तरी असावा ठसा पावलाचा, मजलाच का दिसावा डाव नियतीचा असा उधळला असावा सांगावा कुणी का मज धाडला नसावा आशेचा घेऊन किरण उगवला असावा निशब्धच पाहून तो हि हसला असावा माझाच विषय मजला कळला नसावा आशय धुंडाळताना देह गळला असावा मज सम अभागी मीच एकटा असावा नाशिबाने जगी दुसरा कुणी ही नसावा

तुझी आठवण येते तेव्हा..

तुझी आठवण येते तेव्हा.. देवा एकाच मागणी तिची पापणी भरू दे माझ्या नावाचा एक तरी थेंब तिच्या नयनी तरु दे.. रात अशी ही तंद्रित पापणिहि बघ लवते आहे ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे तुझी आठवण येते तेव्हा तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो तु येणार नाहीस माहित असतं डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो.. एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल, असा एकतरी क्षण असेल जेव्हा ती मला आठवत असेल तू समोर असतेस तेंव्हा बोलू देत नाहीस | तू समोर नसतेस तेंव्हा झोपू देत नाहीस || तो ढग बघ कसा बरसण्यासाठी आतुरलाय तुझ्या चिंब गालावरुन ओघळला म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय माझ्या शब्दांना अजुन तरी काहीच अर्थ नाही. जोपर्यंत त्या गीताला तुझ्या ओठांचा स्पर्श नाही. येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणीशिवाय जात नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही. आज सारे विसरली तू नावही न येई ओठांवर..... कसे मानू तू कधी खरे प्रेम करशील कुणावर...... तेव्हा सागर किनारी साक्षीने तू घेतल्यास किती शपथा..... किती मारल्यास मिठया तू तो चंद्र ढगात लपता........ नजरेत जरी अश्रू असले तरी ओठावर हास्य असाव ओठावरच्या हास्यामागे नजरेतल्या अश्रूना लपवाव. कसे करू माफ़ तुला जे घाव तू मला दिले...... घेऊन माझी फूले तू काटेच मला दिले...... डोळे पुसण्यास माझे पाऊस धावूनी आला, थेंब कोणता तुझा नि माझा हेच कळेना म्हणाला. आज पुन्हा तुझी आठवण आली आणि मी उगीच हसु लागलो खोटं खोटं हसताना... कळलेच नाही, कधी रडु लागलो... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर मनातला प्रत्येक क्षण ओठांवरती येईल का? ओठांवरील प्रत्येक शब्द मनातच राहील का?

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो , ती एक देवाची सुंदर कलाकृती असते . तो अंधारावर मिळविलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते . आणि आपल्या आयुषातल्या नव्या दिवसाची आणि नव्या ध्येयाची सुरवात असते .ll शुभ प्रभात ll

***आठवतेय ती शाळेची घंटा...

***आठवतेय ती शाळेची घंटा... घंटा वाजली की मन असे फिरायचे, जाऊन बसावे परत त्या बाकांवरती असा हट्ट करायचे, ती वेळ आणि ते वय परत नाही येणार कधी, मग एकटेच ती खंत करत बसायचे... आज नाहीये काही अधिक पण बाकी सगळे वजा, वर्गात केलेली मस्ती आणि बाईंनी दिलेली सजा, Computer आणि Calculater च्या युगात अगदी विसरलोय पाढयांची मजा, पाढे पाठ नाही झाले म्हणून कधी घेतलेली रजा... आज ऑफिसच्या कामातून वेळ पुरतच नाही, भंडावले डोके काही कळतच नाही, म्हणून आठवतोय ते शाळेतील खेळ, कधी कब्बडी, कधी खो-खो आणि शाळे समोरील भेळ... जेव्हा नसायचे वर्गात लक्ष, पण परीक्षेत मात्र झोप उडायची, मग एन वेळी मित्राच्या साथीने थोड़ी कॉपी करायची, होइल यावर पास याची खात्री मात्र असायची, पण तरीही पालक सभेला दांडी मारायची तयारीच असायची... शाळेत उशिरा येण्याची तशी सवयच होती, पण शाळा सुटल्यावर पळायची जरा घाईच असायची, त्या घंटेचा नाद आजही अगदी कानात घुमतोय, आज शाळा सूटण्याची नाही तर शाळा भरण्याची वाट पाहतोय, बाल मित्र आणि जुन्या सवंगडयांसोबत हेच गाणे गातोय, आठवनींच्या विश्वामध्ये तेच दिवस पाहतोय.... आणि फ़क्त उरलेल्या आठवणी चाफतोय....!