तू रुसलीस की..
मन ओसाड "मृगजळ" होते..
तुझ्या एका हाकेसाठी..
सैरावैरा धावत असते..
तुला तुटताना पाहून..
देवाकडे एक वर मागेन..
या जन्मी तू माझी नाहीस..
पण पुढील मी तुझाच असेन..
पाण्यावरचे तरंग...
हवे सोबत हिंडत असतात..
मनावरचे तरंग मात्र...
आतल्या आत कुढत असतात..
आज पुस्तकाची पाने चाळताना..
एक गुलाबाची पाकळी दिसली...
अजूनही तशीच टवटवीत..
पण तिच्यात जगायची जिद्द कुठली..?
कोण म्हणते.
थेंबाला नाव नसते..
जे डोळ्यातून ओघळतात..
त्यांचे ही अश्रू म्हणून अस्तित्व असते..
No comments:
Post a Comment