Tuesday, August 23, 2011

हो हो आलो मी पुन्हा.. तुझ्या आस पास वावरायला..

निळ्या आभाळाचं या काळ्या धरतीवर प्रेम
पावसाच्या रूपाने नेहमी जात असते उतू
कुणीच म्हणून नये पावसाळा याला सये
हा तर त्यांच्या निर्मळ मिलनाचा ऋतू

घेवून संगतीला तुला गं साजणे
जायचे आहे पल्याड नभांच्या
पकडून हात हातात तुझा कायमचा
खेळ संपवायचा आहे सावल्यांचा

येशील ना गं ????????????


वाट पाहते मी सख्या तुझी..
दिवस असो वा रात्र..

अजून किती वाट पाहू तुझी..
नेहमी असेच चालू असते हे सत्र..



हो हो आलो मी पुन्हा..
तुझ्या आस पास वावरायला..
माहित आहे तुला नको मी..
पण आलोय पुन्हा तुला सावरायला..



No comments:

Post a Comment