Monday, May 14, 2012

१२ डिसेंबर ,रक्त आणि गुलाल

१२ डिसेंबर ,रक्त आणि गुलाल आजची परिस्थिती ईतकी गंभीर आहे कि प्रकृती साथ देत नसतानाही अण्णा हजारेंना पुन्हा उपोषणाला बसावे लागत आहे. ते का? याचा जराही विचार न करता,,, १२ डिसेंबर ला लोक ....... नावाच्या ईसमाला जाणता राजा बनवू पाहत आहेत मोठ्मोठ्ठले ब्याणार लावून त्याचे वाढदिवस साजरे करत आहे. खरतर हा दिवस साजरा करायचा असेलेच तर तो क्रांतिकारी दिवस म्हणून साजरा करावा,,, ईतक या दिवसाच महत्व आहे,,,, कारण हि क्रांती होती एका सर्व सामान्य माणसाची ,त्याच्या निधड्या छातीची त्याच्या देशप्रेमाची ,त्या माणसाच नाव होत बाबू गेनू,,,,,, १२ डिसेंबरलाच बाबू गेनू यांनी स्वदेशीच्या चळवळीत स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. (हो तशी .............. दिली बरका,,,पण ................चारणी.) तर,,अत्यंत निर्दयपणे त्या क्रूर सार्जंटने त्यांच्या शरीरावरून विदेशी मालाचा तो ट्रक नेला,,, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या पण दुर्दैव असे,,कि , "स्वातंत्र्या नंतर या रक्ताचा टीळा लावून देशहिताचे कार्य समर्पणाच्या भावनेतून करण्याऐवजी स्वतःचे आणि नातेवाईकांचे पोट भरणाऱ्या राजकारण्यांवर गुलालाची उधळण होवू लागली . आणि या धारेवर सांडलेल्या रक्ताची किंमत संपली." म्हणूनच अण्णा हजारेंना उपोषण करावे लागत आहे, बाबू गेनू कुणी मोठ्ठा पैसेवाला नव्हता, शिकलेलाहि नव्हता, तथाकथीत बुद्धीमंत तर मुळीच नव्हता, हातावर पोट अशी त्याची अवस्था मारतानाही कुटुंबासाठी एक छाद्दाम हि ठेवला नाहता. त्याचाकडे होते या देशाप्रती निर्व्याज प्रेम ,,,,म्हणून तो अजरामर झाला हुतात्मा झाला. अत्यंत गरिबीत वाढलेला हा मुलगा दोन वर्षाचा असतानाच वडील वारले. घरातील एकमेव संमपत्ती म्हणजे एक बैल आणि जमिनीचा वितभर तुकडा, पण काही दिवसातच बैल वारला. आणि बाबू गेनू यांनी आईसह गाव सोडले मुंबईची वाट धरली. मोलमजुरीवर कसेबसे जगात होते पण तरीही ,,, याही परिस्थितीत त्यांच्या मनात स्वदेशीचे प्रेम निर्माण झाले जे काम करायला भर्ल्यापोटीहि कुणी तयार होत नाहि. तिथे हा प्रत्येक स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होत असे. झाल विदेशी मालाची होळी करा असा आदेश आला ,,, सारा देश त्या आंदोलनात सहभगी झाला मग बाबू गेनू कसा मागे राहील,,,, त्याला कळल विदेशी मालाने भरलेला एक ट्रक काळबादेवीतून जाणार आहे . आणि हा पठ्या गेला सगळ्यात पुढे छातीचा कोट करून त्या ट्रकला अडवलं. पोलीस आले त्यांनी आंदोलकांना हटवले पण बाबू गेनू हटनार्यान पैकी नव्हता . ते पाहून त्या संतप्त हरामखोर ब्रिटीश पोलिसाने त्या ट्रक चालकाला बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रक न्यायाच आदेश दिला पण ट्रकचा चलाखी हिंदू होता बलबीरसिंग त्याच नाव त्याने ट्रक अंगावर घालणार नाही असे बजावले त्यावेळी, तो ब्रिटीश पोलीस स्वतः त्याला खेचून ट्रक सुरु केला आणि तो ट्रक बाबू गेनू यांच्या अंगावर घातला.,,,,,,,,, गरीब अर्धपोटी,अशिक्षित बाबू गेनू देशप्रेमाचा धडा आम्हाला शिकवून गेला . देशाचा नागरिक कसा असावा याचा वस्तुपाठ घालून गेला आणि आम्ही ????????? भरल्या पोटी ढेकरा देवून पुढच्या सात पिढ्यांचा उद्धार करणाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात मश्गुल आहोत? ज्यादिवशी आम्हाला देशप्रेम काय असते ते कशाशी खातात हे समजेल,, त्या दिवशी अण्णा हजारेंना उपोषणाला बसावे लागणार नाही ,,, त्या दिवशी कुट्ल्याही विदेशी कंपन्या पुन्हा भारतात आणून देशाची आणि समाजाची प्रगती करावी लागणार नाही. आमोल घायाळ ,मुंबई ( सदस्य -हुतात्मा बाबू गेनू सैद युवा प्रतिष्ठान )

No comments:

Post a Comment