
Monday, May 14, 2012
एकदाच मला भेटशील का....थोडं ऐकून घेशील का..
वेळ असेल तुला तर
एकदाच मला भेटशील का....
दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का...?...
पूर्वी तू माझ्याशी खुप काही बोलायचीस
वेळ नसला तरी माझ्यासाठी खुप वेळ काढायचीस
तासन तास माझ्याशी खुप गप्पा मारायचीस
नसले विषय तरी नविन विषय काढायचीस...
काही ही बोलूंन मला खुप खुप हसवायचीस
माझा फ़ोन एंगेज असला की खुप खुप रागवायचीस
आता कशाला आमची गरज पडेल
असं म्हणून सारख चिडवायचीस,
माझा चेहरा पडला तर खुप नाराज व्हायचीस
मग जवळ घेऊन sorry ही म्हणायचीस...
आज ही मला तुझा प्रत्येक क्षणी भास होतो
का गं अशी वागतेस
का देतेस त्रास
नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर
माझा श्वास शेवटचं एकदाच भेट
मला पुन्हा नाही देणार त्रास... वेळ असेल तुला तर
एकदाच मला भेटशील का
दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का... शेवटचं
एकदाच मला भेटशील का....?
प्रेमाचा सुगावा
प्रेमाचा सुगावा
पहिल्या प्रेमाचा मज लागला सुगावा
सांगा कुणी कांगावा का केला नसावा
घास प्रीतीचा कुणीच भरवला नसावा
खाल्ल्या मिठाला तो जागला असावा
विसावला हि इथंच कुठ तरी असावा
ठसा पावलाचा, मजलाच का दिसावा
डाव नियतीचा असा उधळला असावा
सांगावा कुणी का मज धाडला नसावा
आशेचा घेऊन किरण उगवला असावा
निशब्धच पाहून तो हि हसला असावा
माझाच विषय मजला कळला नसावा
आशय धुंडाळताना देह गळला असावा
मज सम अभागी मीच एकटा असावा
नाशिबाने जगी दुसरा कुणी ही नसावा
तुझी आठवण येते तेव्हा..
तुझी आठवण येते तेव्हा..
देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे..
रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे
तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..
एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल
तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस |
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस ||
तो ढग बघ कसा
बरसण्यासाठी आतुरलाय
तुझ्या चिंब गालावरुन ओघळला
म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय
माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.
येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही.
आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
तेव्हा सागर किनारी साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू
तो चंद्र ढगात लपता........
नजरेत जरी अश्रू असले
तरी ओठावर हास्य असाव
ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.
कसे करू माफ़ तुला
जे घाव तू मला दिले......
घेऊन माझी फूले
तू काटेच मला दिले......
डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला,
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला.
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना...
कळलेच नाही, कधी रडु लागलो...
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का?
ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?
सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो
सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो , ती एक देवाची सुंदर कलाकृती असते . तो अंधारावर मिळविलेला
विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते . आणि आपल्या
आयुषातल्या नव्या दिवसाची आणि नव्या ध्येयाची सुरवात असते .ll शुभ प्रभात ll
***आठवतेय ती शाळेची घंटा...
***आठवतेय ती शाळेची घंटा...
घंटा वाजली की मन असे फिरायचे,
जाऊन बसावे परत त्या बाकांवरती असा हट्ट करायचे,
ती वेळ आणि ते वय परत नाही येणार कधी,
मग एकटेच ती खंत करत बसायचे...
आज नाहीये काही अधिक पण बाकी सगळे वजा,
वर्गात केलेली मस्ती आणि बाईंनी दिलेली सजा,
Computer आणि Calculater च्या युगात अगदी विसरलोय पाढयांची मजा,
पाढे पाठ नाही झाले म्हणून कधी घेतलेली रजा...
आज ऑफिसच्या कामातून वेळ पुरतच नाही,
भंडावले डोके काही कळतच नाही,
म्हणून आठवतोय ते शाळेतील खेळ,
कधी कब्बडी, कधी खो-खो आणि शाळे समोरील भेळ...
जेव्हा नसायचे वर्गात लक्ष, पण परीक्षेत मात्र झोप उडायची,
मग एन वेळी मित्राच्या साथीने थोड़ी कॉपी करायची,
होइल यावर पास याची खात्री मात्र असायची,
पण तरीही पालक सभेला दांडी मारायची तयारीच असायची...
शाळेत उशिरा येण्याची तशी सवयच होती,
पण शाळा सुटल्यावर पळायची जरा घाईच असायची,
त्या घंटेचा नाद आजही अगदी कानात घुमतोय,
आज शाळा सूटण्याची नाही तर शाळा भरण्याची वाट पाहतोय,
बाल मित्र आणि जुन्या सवंगडयांसोबत हेच गाणे गातोय,
आठवनींच्या विश्वामध्ये तेच दिवस पाहतोय.... आणि फ़क्त उरलेल्या आठवणी चाफतोय....!
काल ती मला म्हणाली.,
काल ती मला म्हणाली.,
"तुला कधी स्वप्न तुटायची भीती नाही वाटत.......?
उंच मनोरे तू स्वप्नांचे बांधतोस..........,
ते कधी कोसळायची भीती नाही वाटत ...........?
...................
...................
मी फक्त हसलो, आणि तिला म्हटले
"अगं तुझ्या स्वप्नातच तर माझे जग आहे....
हे आयुष्यच स्वप्नांच्या हवाली केले आहे
त्यांच्यातच जगणे आणि
त्यांच्यातच विलीन होणे आहे....."
"केवळ एकच क्षण तुझ्यासोबत जगायचा आहे
मग नंतर.... तो स्वप्नांचा मनोरा
माझ्या सकट कोसळला तरी चालेल ..........!!!"
..............
................
"इतका कसा रे स्वप्नाळू तू ?........
इतकी सुध्दा स्वप्ने पाहू नयेत कोणाची.......
किती रमशील स्वप्नांच्या दुनियेत?"
"एक दिवस मी जाईन तुला सोडून.....
मग काय करशील हं?..... "
"आता अजिबात स्वप्ने पाहू नकोस माझी...... "
असं कालच माझ्यावर चिडून मला म्हटली होतीस
आणि............................
........................................
...
........................................
.......................................
........................................
......................
"काल देखील रोज रात्री प्रमाणे
तुझी असंख्य स्वप्ने .....
माझ्याकडेच पाठवली होतीस....
........
........
अगदी न चुकता..............." :)
सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर
वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन
सामावल्या असत्या तर....
कदाचित कधी ङोळेभरून येण्याची वेळ आलीच
नसती,
शब्दांचा आधार घेऊन जर दूखः व्यक्त करता आले
असते तर
कदाचित कधी "अश्रूंची" गरज भासलीच नसती.
आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर
भावनांना किंमत कधी उरलीच नसती!!
फक्त तुझ्याच आठवणींत झुरतो...
आजहि मी...
फक्त तुझ्याच आठवणींत झुरतो...
तुझ्याशी बोलण्यासाठी,
रात्रन- दिस मरतो...
गालावरून ओघळणार्या प्रत्येक आश्रू मध्ये,
फक्त तुलाच शोधत फिरतो ..
अन उगाच्या उगाच त्या चंद्राला पाहून,
गालातल्या गालात हसतो ...
का कुणाच ठाऊक ?,
आजही मी...
तुझ्यावर तितकच प्रेम करतो...
तू माझी नसूनही ..
तुझ्याच नकळत,
तुझ्या आनंदसाठी खूप काही करतो...
कधी तरी होशील परत माझी
हिच आस मनी ठेवतो...
अन वाचशील कधीतरी म्हणून,
रोज तुझ्यासाठी,
एक कविता मी करतो...
एक कविता मी करतो.
प्रेम म्हणजे काय असतं
प्रेम म्हणजे काय असतं ? खरचं ........... प्रेम म्हणजे काय असतं ? ... तिच्या डोळ्यांतील अश्रु जेव्हा ......... आपल्या डोळ्यांतुन ओघळतातं .... ते प्रेम असतं ....... तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा ..... तिच्या गालावरील खळीतुन खुलतं ..... ते प्रेम असतं ....... जेव्हा तिच्या आठवणीच ........ तुमचा श्वास बनतातं ....... ते प्रेम असतं ...... जेव्हा तिच्या येण्याची हलकीशी चाहूल ..... तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ..... ते प्रेम असतं ..... तिच्या काजळ डोळ्यांतील काळजी ..... नकळत सांगुन जाते की ...... या जगात आपलं हक्काचं कुणीतरी आहे ..... ते प्रेम असतं ...... जेथे शब्दांची गरज नसतेच कधी ...... एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो ..... न बोलताच भावना व्यक्त होतात ..... ते प्रेम असतं ...... विरहाचा प्रत्येक क्षण जेथे ...... युगांसमान भासतो ..... ते प्रेम असतं ...... चांदण्या रात्रीतील रेश्मी स्वप्नं ..... दोघांच्या पण डोळ्यांत जन्म घेतातं ..... काही हळुवार क्षणांना दोघंही जिवापाड जपतातं .... ते प्रेम असतं ...... जेथे असतात तिच्या नजरांचे तीक्ष्ण बाण ...... अन् त्यांच अचुक लक्ष्य असतात तुम्ही ..... हेच .......... हेच तर प्रेम असतं ......... !
बाबू गेनूंच्या उरल्या फक्त आठवणी
एक क्रांतिकारी नेता
इंग्रजांच्या जोखडातून देश मुक्त करण्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांचे स्वातंत्र्यदिनी देशभर स्मरण केले जात आहे. स्वातंत्र्यांच्या या चळवळीत अनेकांना प्रणाची आहुती दिली. मुंबईत परदेशी मालाला विरोध करणारे शहीद बाबू गेनू हे असेच एक नाव आहे. बाबू गेनूंचे नाव सध्याच्या तरुण पिढीच्या लक्षात नसेलही. मात्र आजच्या दिवशी त्यांची आठवण महत्वाची आहे.
कोण होते बाबू गेनू
बाबू गेनूचे पूर्ण नाव बाबूराव गेनू असे होते. सध्या चकाचक मॉलमध्ये रूपांतरीत झालेल्या एकेकाळच्या नावाजलेल्या फिनिक्स मिलमध्ये बाबू कामाला होते. बाबूंचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील महाळुंगे हे होते. त्यांचे लौकीक अर्थाने फारसे शिक्षण झालेले नसले तरी देशप्रेमाची मशाल मात्र त्यांच्या मनात सतत धगधगत होती.
१९३० साली महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. मुंबईत परदेशी मालाची विक्री करणा-यांची दुकाने बंद करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. १२ डिसेंबर १९३० रोजी परदेशी मालाला विरोध करत त्यांनी मुंबईच्या काळबादेवी बाजारात कपड्यांनी भरलेले ट्रक अडवले होते. मात्र मालाचा एक ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि त्यात ते चिरडले गेले. या घटनेत बाबू गेनू गंभीर जखमी झाले. त्यांना लगतच्या जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बाबू गेनू रस्त्याची सद्यस्थिती
ज्या रस्त्यावर बाबू गेनूंना परदेशी मालाने भरलेल्या ट्रकने चिरडले होते त्याला नंतर ' बाबू गेनू रोड ' असे नाव देण्यात आले. या रस्त्याची आजची अवस्था काय आहे ? व्यापारी भाग असलेल्या, साधारण २० फूट रुंद या रस्त्याच्या दुतर्फा आज विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली आहेत. मुख्यत : हस्तकलेच्या वस्तू, वैद्यकीय उपकरणे आणि कपड्यांची दुकाने आपल्याला इथे दिसतात. रस्त्यावर अनेक ठिकाणी अस्वच्छता नजरेस येते आणि दिवसभर वाहनांचा कल्लोळ इथे ऐकायला येतो.
' स्वदेशी चळवळीदरम्यान याच रस्त्यावर बाबू गेनूने आपले प्राण अर्पण केले होते, अशी आम्हाला माहिती मिळते. याव्यतिरिक्त आम्हाला बाबू गेनूविषयी फार काही माहिती नाही ' अशी माहिती सध्याच्या बाबू गेनू रोडवरील एका दुकानदाराने दिली. विशेष म्हणजे बाबू गेनूच्या घटनेच्या वेळी या दुकानदाराचे आजोबा येथे व्यवसाय करत होते.
बाबू गेनूंविषयी अधिक विचारले असता हा दुकानदार म्हणाला, ' बाबू गेनूंविषयी इथं कधीही फार काही चर्चा केली जात नाही. त्यामुळं त्यांच्याविषयी आम्हाला माहिती मिळत नाही. '
या रस्त्याच्या कडेला एका छत्रीविक्रेत्याकडे चौकशी केली असता तो म्हणाला , ' वर्षातून एकदा बाबू गेनूंच्या जयंतीदिनी परिसरातले काही लोक इथं एकत्र येतात. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काही जण भाषणे करतात. आणि निघून जातात. त्याव्यतिरिक्त वर्षभर इथं फारसं काही होत नाही. '
या रस्त्यावर फेरफटका मारला असता बाबू गेनूंची आठवण म्हणून इथं कुठेही त्यांचा पुतळा किंवा प्रतिमा उभारलेली दिसत नाही.
१२ डिसेंबर १९३० रोजी मात्र या परिसरातली परिस्थिती एकदम वेगळी होती. बाबू गेनू शहीद झाले त्या ठिकाणी शहरातल्या शेकडो लोकांनी रांगा लावल्या होत्या. पुढचे दोन दिवस या रस्त्यावर बाबू गेनूंच्या रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. बाबू गेनूंना श्रद्धांजली वाहत शहरातल्या नागरिकांनी या जागेवर पुष्पं वाहिली तर काहींनी अगरबत्ती लावली होती. परदेशी मालाचा निषेध करत नागरिकांनी शहराच्या विविध भागात कपड्यांची होळी केली होती. या घटनेनंतर पुढचे काही दिवस मुंबईतील ' टाइम्स ऑफ इंडिया ' , ' नवाकाळ ' , ' बॉम्बे क्रॉनिकल ' , ' मुंबई समाचार ' या त्यावेळच्या नावाजलेल्या वर्तमानपत्रांनी वृत्तांकन केले होते.
बाबू गेनूंचा मृत्यू कसा झाला
परदेशी कपड्यांचे व्यापारी या परिसरात ट्रकमध्ये माल भरत होते. त्यावेळी स्वदेशी आंदोलन जोरात सुरू होतं. त्यामुळं आंदोलनकर्त्यांचा त्रास होऊ नये म्हणून या इंग्रज व्यापा-याने पोलिसांकडून सुरक्षा मागितली होती. दरम्यान परदेशी कपड्यांचे गठ्ठे भरलेला ट्रक या रस्त्यावरून जात असताना काही स्वदेशीच्या आंदोलनकर्ते ट्रकसमोर आडवे झाले. त्यात बाबू गेनू हेही होते. विठोबा धोंडू नावाचा एक भारतीय ट्रक चालवत होता. आंदोलनकर्त्यांच्या अंगावरून ट्रक नेण्यास त्याने नकार दिला. ट्रकमध्ये बसलेल्या एका ब्रिटीश सार्जंट त्यामुळं रागावला. त्याने ट्रकचा ताबा घेतला आणि थेट आंदोलनकर्त्यांच्या अंगावरून नेला. त्यातच बाबू गेनी शहीद झाले.
या घटनेनंतर ब्रिटीश सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत खुलाशात म्हटले आहे की ट्रक चालक जखमी झाल्यामुळं तो बेशुद्ध झाला. त्यानंतर ब्रिटीश सार्जंटने ट्रकचा ताबा घेतला. तोपर्यंत ट्रकवरचा त्याचा ताबा सुटला होता आणि तो आंदोलनकर्त्यांच्या अंगावर आदळला. आंदोलनकर्त्यांना जखमी करण्याचा ब्रिटीश सार्जंटचा कोणताही हेतू नव्हता, असं या खुलाशात म्हटलं आहे. ट्रकखाली सापडलेल्या इतर आंदोलनकर्त्यांना हळूहळू काढण्यात आले. मात्र बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्यानं ते गंभीर जखमी झाले आणि त्याचत मृत्यू झाला.
या घटनेनंतर मुंबईत लोकांचा जनक्षोभ उसळला होता. बाबू गेनूंच्या अंत्ययात्रेसाठी हजारो लोक जमा झाले होते. शहराच्या मध्यभागातून अंत्ययात्रा निघाली. बाबू गेनूंवर गिरगाव चौपाटीवर अंत्यसंस्कार व्हावे अशी लोकांची इच्छा होती. या ठिकाणी पूर्वी स्वातंत्र्य चळवळीतील जेष्ठ नेते बाळ गंगाधर टिळक यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते. टिळकांसारखं सन्मान बाबू गेनूंना मिळावा अशी लोकांची इच्छा होती. मात्र इंग्रजांनी ही परवानगी नाकारली. तेव्हा लोकांचा राग अनावर झाला. परिणामी ब्रिटीश पोलिस आणि मुंबईतल्या नागरिकांमध्ये चांगल्याच झटापटी झाल्या. नंतर स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी लोकांना समजावले. आणि शेवटी इंग्रजांनी ठरवून दिलेल्या जागेवर बाबू गेनूंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाबू गेनूच्या कवटीला मार लागल्यामुळं त्याच्या मेंदूतून रक्तस्त्राव झाला असल्याचं वैद्यकीय अहवालात म्हटलं होतं. या घटनेच्या वेळी सर्व आंदोलक जखमी झाल्यानं कोणताही साक्षीदार नोंदवण्यात आलेला नव्हता.
बाबू गेनू हा कॉंग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं सांगत कॉंग्रेस कार्यालयात त्याचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. क्वीन्स् रोडवर झालेल्या अंत्यसंस्काराच्यावेळी स्वातंत्र्य चळवळीतील जेष्ठ नेते जमनालाल बजाज, लिलावती मुंशी, पेरीन कॅप्टन आणि जमनादास मेहता या प्रभूती उपस्थित होत्या.
बाबू गेनू परळमध्ये राहत होते. त्यामुळं परळच्या कामगार मैदानात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुतळा उभारण्यात आला आहे. पुण्यातल्या एका रस्त्याला बाबू गेनूचे नाव देण्यात आले असून त्यांच्या नावाने एक संस्थाही आहे. स्वदेशीच्या चळवळीत आपले प्राण झोकूण देणा-या या विराविषयी भारतीय स्वातंत्र्याइतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही.
ज्या मुंबई शहरात बाबू गेनूने देशासाठी आपले प्राण त्यागले तिथं एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र ६२ वा स्वात्रदिवस साजरा करत असताना बाबू गेनूसारख्या शहीदाला आपण विसरत चाललो असल्याची भावना मनात घर करून राहते.
आमोल घायाळ ,मुंबई
( सदस्य -हुतात्मा बाबू गेनू सैद युवा प्रतिष्ठान )
१२ डिसेंबर ,रक्त आणि गुलाल
१२ डिसेंबर ,रक्त आणि गुलाल
आजची परिस्थिती ईतकी गंभीर आहे कि
प्रकृती साथ देत नसतानाही अण्णा हजारेंना
पुन्हा उपोषणाला बसावे लागत आहे.
ते का? याचा जराही विचार न करता,,,
१२ डिसेंबर ला लोक ....... नावाच्या ईसमाला जाणता राजा बनवू पाहत आहेत
मोठ्मोठ्ठले ब्याणार लावून त्याचे वाढदिवस साजरे करत आहे.
खरतर हा दिवस साजरा करायचा असेलेच तर तो क्रांतिकारी दिवस म्हणून साजरा करावा,,,
ईतक या दिवसाच महत्व आहे,,,,
कारण हि क्रांती होती एका सर्व सामान्य माणसाची ,त्याच्या निधड्या छातीची
त्याच्या देशप्रेमाची ,त्या माणसाच नाव होत बाबू गेनू,,,,,,
१२ डिसेंबरलाच बाबू गेनू यांनी स्वदेशीच्या चळवळीत स्वतःच्या प्राणाची आहुती दिली.
(हो तशी .............. दिली बरका,,,पण ................चारणी.)
तर,,अत्यंत निर्दयपणे त्या क्रूर सार्जंटने त्यांच्या शरीरावरून विदेशी मालाचा तो ट्रक नेला,,,
रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या पण दुर्दैव असे,,कि ,
"स्वातंत्र्या नंतर या रक्ताचा टीळा लावून देशहिताचे कार्य समर्पणाच्या भावनेतून करण्याऐवजी
स्वतःचे आणि नातेवाईकांचे पोट भरणाऱ्या राजकारण्यांवर गुलालाची उधळण होवू लागली .
आणि या धारेवर सांडलेल्या रक्ताची किंमत संपली."
म्हणूनच अण्णा हजारेंना उपोषण करावे लागत आहे,
बाबू गेनू कुणी मोठ्ठा पैसेवाला नव्हता, शिकलेलाहि नव्हता,
तथाकथीत बुद्धीमंत तर मुळीच नव्हता, हातावर पोट अशी त्याची अवस्था मारतानाही
कुटुंबासाठी एक छाद्दाम हि ठेवला नाहता.
त्याचाकडे होते या देशाप्रती निर्व्याज प्रेम ,,,,म्हणून तो अजरामर झाला हुतात्मा झाला.
अत्यंत गरिबीत वाढलेला हा मुलगा दोन वर्षाचा असतानाच वडील वारले.
घरातील एकमेव संमपत्ती म्हणजे एक बैल आणि जमिनीचा वितभर तुकडा,
पण काही दिवसातच बैल वारला. आणि बाबू गेनू यांनी आईसह गाव सोडले मुंबईची वाट धरली.
मोलमजुरीवर कसेबसे जगात होते पण तरीही ,,,
याही परिस्थितीत त्यांच्या मनात स्वदेशीचे प्रेम निर्माण झाले जे काम करायला
भर्ल्यापोटीहि कुणी तयार होत नाहि. तिथे हा प्रत्येक स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होत असे.
झाल विदेशी मालाची होळी करा असा आदेश आला ,,,
सारा देश त्या आंदोलनात सहभगी झाला मग बाबू गेनू कसा मागे राहील,,,,
त्याला कळल विदेशी मालाने भरलेला एक ट्रक काळबादेवीतून जाणार आहे .
आणि हा पठ्या गेला सगळ्यात पुढे छातीचा कोट करून त्या ट्रकला अडवलं.
पोलीस आले त्यांनी आंदोलकांना हटवले पण बाबू गेनू हटनार्यान पैकी नव्हता .
ते पाहून त्या संतप्त हरामखोर ब्रिटीश पोलिसाने त्या ट्रक चालकाला
बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रक न्यायाच आदेश दिला पण ट्रकचा चलाखी हिंदू होता
बलबीरसिंग त्याच नाव त्याने ट्रक अंगावर घालणार नाही असे बजावले त्यावेळी,
तो ब्रिटीश पोलीस स्वतः त्याला खेचून ट्रक सुरु केला आणि तो ट्रक बाबू गेनू यांच्या अंगावर घातला.,,,,,,,,,
गरीब अर्धपोटी,अशिक्षित बाबू गेनू देशप्रेमाचा धडा आम्हाला शिकवून गेला .
देशाचा नागरिक कसा असावा याचा वस्तुपाठ घालून गेला
आणि आम्ही ?????????
भरल्या पोटी ढेकरा देवून पुढच्या सात पिढ्यांचा उद्धार करणाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात मश्गुल आहोत?
ज्यादिवशी आम्हाला देशप्रेम काय असते ते कशाशी खातात हे समजेल,,
त्या दिवशी अण्णा हजारेंना उपोषणाला बसावे लागणार नाही ,,,
त्या दिवशी कुट्ल्याही विदेशी कंपन्या पुन्हा भारतात आणून देशाची आणि समाजाची
प्रगती करावी लागणार नाही.
आमोल घायाळ ,मुंबई
( सदस्य -हुतात्मा बाबू गेनू सैद युवा प्रतिष्ठान )
माझ तुझावर खूप प्रेम आहे..
माझ तुझावर खूप प्रेम आहे..
खूप काळानंतर कोणासाठी तरी
मनात प्रेम जागृत झाल,
पण काही कारणांमुळे ते मी व्यक्त
ही करू शकलो नाही.........
माहित आहे मला तू माझावर’
मनापासून प्रेम करतेस ,
त्या प्रेमाला जाणूनही मी
तुझावर मनमोकळे पाने प्रेम
करु शकत नाही...........
जीवनाच्या अशा वळणावर मी आलो
आहे,जिथे मी तुझा स्वीकारही करू
शकत नाही अन तुझाशिवाय
राहू शकतही नाही..........
माझा मनातल प्रेम मी कधी तुला
समजू देणार नाही,
पण मनातून नेहमीच प्रेम तुझावर
करत राहणार
ओठावरील हास्यामागे हे दुःख मी
नेहमी लपवत राहणार..........
अमोल राजे
Subscribe to:
Posts (Atom)