तू लडिक लाजताना खुलते गाली खळी,
गंधलेल्या फुलांची हसते हरेक पाकळी…
आसुसलेल्या पाखरांना खबर कशी लागली
गोड गोड मकरंदाची चव त्यांनी चाखली…!
तू मला पाहताना भाळी बट हि लाटली,
हळूच नाटी त्रासून तू कानी तिला घेतली…
पाहुनी हे दृश्य ह्रिदयी घालमेल वाढली,
निमिषभर काळजाला ती कटार वाटली…!
तू दबुन बोलताना बोलली नयनबाहुली,
ओठांनी तुझ्या आपसातील गाठ आप सोडली…
शिंपल्यातील शुभ्र मोत्यांची नजर मज जाहली,
डोही जणू हंसांची माळरांग भासली…!
तू वळून चालताना दिशाही मागे चालली,
तुझ्या पावलांच्या ठश्यांवर सांजेने कात टाकली…
आकाशी मग चांद आणि चांदणीही सांडली,
काळ्याभोर अंगणात रांगोळी छान मांडली…!
No comments:
Post a Comment