Tuesday, January 10, 2012

सगळ्याच प्रश्नांची उत्तरे असती

सगळ्याच प्रश्नांची उत्तरे असती
तर प्रश्नाची निर्मिती झालीच नसती
दुक्खाचे दिवस भोगल्याशिवाय
सुखाची प्रचीती पण आली नसती

नेहमी आपण दुसर्याला दोष देतो
कधी परिस्थिती ला तर कधी वेळे ला
पण मनात डोकावून कधी पाहत नाही
कारण लोकच पुन्हा बोलतात
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही

प्रत्येकाचा स्वतःचा स्वतःला एक प्रश्न असतो
प्रत्येक जन स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार स्वतः असतो
आम्ही तुम्ही फक्त पर्याय देवू शकतो
पण परिणामांना सामोरे तर तोच जाणार असतो

तसे परिणामांची पर्वा न करता पुढे जाणारे खूप असतात
पण त्याचे सावट मात्र स्वतः सह दुसरे पण भोगतात

जो दिवा स्वतःला उजेड देण्यासाठी जळत राहतो
तो स्वतःला तर अंधारातच ठेवतो
आणि ज्यांच्या आयुष्यात उजेड करतो
ते बोलतात मिनमिनता प्रकाश आहे
सूर्य कुठे हा फक्त काजवा आहे....

No comments:

Post a Comment