" तुझ्याशिवाय "
तुझ्याशिवाय जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे.
आयुष्य तर कधिच संपले,
आता नूसतेचं जगणार आहे.
अंगणामधले फुल सुद्धा,
तुझ्याशिवाय कोमेजणार आहे.
देवार्यातली वात देखील,
तुझ्या विरहात जळणार आहे.
येणारी प्रत्येक राञ आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे.
अन् रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे.
स्वप्न तर केव्हांचेच तुटले,
आठवणी फक्त राहणार आहे.
तु जरी सोडुन गेली असलीस,
तरी तु माझ्यातच ऊरणार आहे.
तुझी येण्याची आशा कधीच सोडली,
आता मीच जग सोडणार आहे.
तुझ्याशिवाय जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे.
No comments:
Post a Comment