Tuesday, January 10, 2012











तू लडिक लाजताना खुलते गाली खळी,

तू लडिक लाजताना खुलते गाली खळी,

गंधलेल्या फुलांची हसते हरेक पाकळी…

आसुसलेल्या पाखरांना खबर कशी लागली

गोड गोड मकरंदाची चव त्यांनी चाखली…!

तू मला पाहताना भाळी बट हि लाटली,
हळूच नाटी त्रासून तू कानी तिला घेतली…
पाहुनी हे दृश्य ह्रिदयी घालमेल वाढली,
निमिषभर काळजाला ती कटार वाटली…!

तू दबुन बोलताना बोलली नयनबाहुली,
ओठांनी तुझ्या आपसातील गाठ आप सोडली…
शिंपल्यातील शुभ्र मोत्यांची नजर मज जाहली,
डोही जणू हंसांची माळरांग भासली…!

तू वळून चालताना दिशाही मागे चालली,
तुझ्या पावलांच्या ठश्यांवर सांजेने कात टाकली…
आकाशी मग चांद आणि चांदणीही सांडली,
काळ्याभोर अंगणात रांगोळी छान मांडली…!

" तुझ्याशिवाय "

" तुझ्याशिवाय "



तुझ्याशिवाय जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे.
आयुष्य तर कधिच संपले,
आता नूसतेचं जगणार आहे.



अंगणामधले फुल सुद्धा,
तुझ्याशिवाय कोमेजणार आहे.
देवार्यातली वात देखील,
तुझ्या विरहात जळणार आहे.


येणारी प्रत्येक राञ आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे.
अन् रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे.



स्वप्न तर केव्हांचेच तुटले,
आठवणी फक्त राहणार आहे.
तु जरी सोडुन गेली असलीस,
तरी तु माझ्यातच ऊरणार आहे.


तुझी येण्याची आशा कधीच सोडली,
आता मीच जग सोडणार आहे.
तुझ्याशिवाय जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे.

माझ्यात काय आवडतं?

ती : माझ्यात काय आवडतं?
तो : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत
... मला....पण "तुझ्या मनातला मी" आवडतो मला...
ती : किती प्रेम करतोस माझ्यावर???
तो : हे माझ्या हातातलं हिरवं पान दिसतंय? त्या पानावर जितक्या हिरव्या शिरा आहेत न तितकंच प्रेम करतो. जास्त नाही.
ती : मला कधी विसरशील?
तो : एकदम सहज विसरेन....हा आकाशातला सूर्य उगवायचा थांबला ना कि विसरेन.
ती : कधी आठवशील मला?
तो : आठवण सारखी सारखी का काढू ? कधी तरीच काढेन... पापण्यांची उघडझाप करतील ना तेव्हाच काढेन.
ती : तुझ्या सोबत राहिल्याने मला काही तोटा होईल का?
तो : तोटा तर आहेच...माझ्या सोबत राहिलीस तर तुला तुझं दु:ख कधीच एकटीला अनुभवता येणार नाही. त्यात अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी काढून
ठेवावा लागेल.
ती : माझ्या कोणत्या गोष्टीवर तूझा सर्वात जास्त हक्क आहे?
तो : तुझ्या जगण्यावर नसेल माझा हक्क पण...तू
माझ्याशिवाय एकटी हे जग सोडून जाऊ नाही शकणार..
सगळं ऐकून आभाळातल्या उगवत्या सुर्याखाली हातात पान घेतलेल्या पापण्यांची उघडझाप करणाऱ्या त्याला पाहताना तिच्या डोळ्यात
फक्त पाणीच होते.
तो क्षण काय होता...याचं उत्तर दोघांकडेही नव्हतं...
पण तो क्षण शिंपल्यातल्या मोत्यासारखा होता......
Amol.ghayal123@yahoo.co.in

सगळ्याच प्रश्नांची उत्तरे असती

सगळ्याच प्रश्नांची उत्तरे असती
तर प्रश्नाची निर्मिती झालीच नसती
दुक्खाचे दिवस भोगल्याशिवाय
सुखाची प्रचीती पण आली नसती

नेहमी आपण दुसर्याला दोष देतो
कधी परिस्थिती ला तर कधी वेळे ला
पण मनात डोकावून कधी पाहत नाही
कारण लोकच पुन्हा बोलतात
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही

प्रत्येकाचा स्वतःचा स्वतःला एक प्रश्न असतो
प्रत्येक जन स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार स्वतः असतो
आम्ही तुम्ही फक्त पर्याय देवू शकतो
पण परिणामांना सामोरे तर तोच जाणार असतो

तसे परिणामांची पर्वा न करता पुढे जाणारे खूप असतात
पण त्याचे सावट मात्र स्वतः सह दुसरे पण भोगतात

जो दिवा स्वतःला उजेड देण्यासाठी जळत राहतो
तो स्वतःला तर अंधारातच ठेवतो
आणि ज्यांच्या आयुष्यात उजेड करतो
ते बोलतात मिनमिनता प्रकाश आहे
सूर्य कुठे हा फक्त काजवा आहे....

Thursday, January 5, 2012

मला प्रेम झाल ..

मला प्रेम झाल ..मला प्रेम झाल..
फक्त तुझ्यावर, ...
तुझ्या त्या गोड हसण्यावर,
हसताना दात लपवायच्या तुझ्या अदे वर...
तुझ्या फुलणाऱ्या त्या लाल ओठांवर..

आठवून हि तुला, अस का वाटत?

आठवून हि तुला, अस का वाटत?,
आता न आठवलेलच बर...
पाहून हि तुला, अस का वाटत?,
आता न पाहिलेलंच बर...
जगून हि फक्त तुझ्याच साठी, असं का वाटत?,
आता न जगलेलच बर...
फक्त तुझ्यावरच प्रेम केल्यामुळे, असं का वाटत?
परत कोणावरही न केलेलंच बर...
अन,
हरवून तुला आयुष्यातून माझ्या,अस का वाटत?,
परत कोणालाच न हरवलेलं बरं..
परत कोणालाच न हरवलेलं बरं............:)

एका गावात एक मुलगी राहात असते.

एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.

त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी
मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला
मिळायला
हवी, असा तिचा कटाक्ष असे.

त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी
शेजारची
राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी
भीती
तिच्या मनात नेहमीच असते.

दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याचा आत्मविश्वास
वाखाणण्यासारखा
असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून
घेत
असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा
तेव्हा
ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर
पडण्याचा मार्ग सांगतो.

तिचा पहिला मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता
राखण्यात
त्याचा मोठा सहभाग असतो. तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र
तिच्यावर
खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.





एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही.
आपल्याकडे खूप
कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो,
""माझ्याकडे
भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा
मृत्यू
होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.

ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर
सर्वाधिक
प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी
खूप
काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?
माझी साथ
करशील ना?''

""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.

त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.

त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम
केले.
आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही' म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू
गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''

त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.

आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""मी नेहमीच तुझ्याकडे
मदतीच्या
अपेक्षेने येते. तूही मला मदत करतोस. माझ्या सुख-दुःखात सहभागी होतोस.
यावेळीही
तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''

""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे
नाही.''

त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत
नाही.

.. तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे
मी
येईन.''

ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो..
पोषणाअभावी,
दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ
निघून
गेली आहे.''

000

वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.

आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही
चोचले
पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते. आपला तिसरा मित्र
म्हणजे, आपली
मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप
दुसऱ्याचे होते. दुसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते
आपल्या
कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू
शकतात.


आणि पहिला मित्र म्हणजे कोण? ........

... पहिला मित्र म्हणजे आपला 'अंतरात्मा' (परमेश्वेर) ज्याच्याकडे आपण
जास्त
लक्ष देत नहीं अणि तोच आपला शेवटपर्यंत सोबती असतो.

सांग कसा मी विसरू तिला

सांग कसा मी विसरू तिला

ह्रदयाच्या प्रत्येक कप्यात
आणि प्रत्येक स्पदनांत तिचा आहे
एकवेळ ह्रदयाचा प्रत्येक कपा बंद करेल
मग ह्रदयाच काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात
आणि प्रत्येक विचारात तीच आहे
एकवेळ तिचा विचार करणं बंद करेल
मग मनाचं काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

अंतकरणाच्या प्रत्येक स्वप्नात
आणि प्रत्येक जाणिवेत तिच आहे
एकवेळ स्वप्न बघण बंद करेल
मग अंतकरणाच काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

माझ्या प्रत्येक प्रत्यनात
आणि प्रत्येक आठवणीत तिचं आहे
एकवेळ आठवण काढण बंद करेल
मग माझ काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले.

३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले.

बिल आले ७५ रुपये.

तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर ला दिले.

मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन त्यांना परत दिले.

…वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन , तिघांना १, १, १ रुपया परत दिला.

… म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले
मग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४
मग १ रुपया कुठे गेला ????


नीट विचार करून उद्या सांगा,............


आता कड कडन जा घरी, जेवा आणि शांत पणे झोपा...

त्याची अन तिची पहिली भॆट

त्याची अन तिची पहिली भॆट

दोघांची होणाऱी "नजऱभेट"

काळजाला जाऊन भिडणारी थेट

दोघांचं एकमेकांना पाहून हसणं

अन नाजुकशा जाळ्यात अलगद फसणं...

या हसण्या या फसण्याची

सवय झालीय सगळयांना...

नजऱभेटीचं रूपांतर चोरून भॆटीत

भेटीचं रूपांतर हळुवार मिठीत

अन त्याहीपुढे कित्येक पटीत

नात्यातल्या या वेगाची

सवय झालीय सगळयांना...

मग रंगू लागतात स्वप्नं

एक त्याचं,एक तिचं फक्त दोन मनं

त्याचं हसणं तेव्हा तिचं हसणं

तिचं रडणं तेव्हा त्याचं रडणं

या हसण्या या रडण्याची

सवय झालीय सगळयांना...

दिल्या जातात वेळा,पाळल्याही जातात वेळा

घेतल्या जातात शपथा दिल्या जातात उपमा

त्याला ती वाटते "रांझ्याची हीर"

तिलाही तो वाटतो "कपूरांचा रणबीर"

या शपथा या उपमांची

सवय झालीय सगळयांना...

मग येतो असाही एक दिवस

पूनवेची रात्र वाटू लागते अवस

दोघांनाही येऊ लागतो एकमेकांचा कंटाळा

हीर वाटू लागते "बधीर" अन

रणबीर वाटू लागतो चक्क "काळा"

या अवसेची या पूनवेची

सवय झालीय सगळयांना...

पहिल्या भेटीच्या चौकातच

फूटतात "नव्या वाटा"

दोघंही करतात एकमेकांना "टाटा"

अहो तु्म्ही कशाला होताय डिस्टर्ब

दुःख वैगरे विसरा

त्याला भॆटते दूसरी

तिलाही भॆटतो दूसरा

पुन्हा होते देवाणघेवाण,पुन्हा होते "दिलफेक"

पुन्हा जुन्या कहानीचा नव्याने "रिटेक"

बदलत्या प्रेमाच्या रंगाची

सवय झालीय सगळयांना...

खरं सांगायचं अगदी मनापासून तर

प्रेम नावाचा "टाईमपास" करण्याची

सवय झालीय सगळयांना...

शब्दच हरवले माझे

शब्दच हरवले माझे
तरि प्रयत्न करते लिहिण्याचा,
ओठ मुके झाले माझे
तरि प्रयत्न करते तुला सांगण्याचा,
आता तर जगच हरवलय माझ
तरिही प्रयत्न करते तुला शोधण्याचा..!!!



स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,
कदचित ती आश्रूंबरोबर
वाहून जातील..... ...
ती ह्रुदयात जपून ठेवावीत,
कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पुर्ण करण्याची
प्रेरणा देईल....!

नात्यांच्या सुपर मार्केटमध्ये,

Designer कपडयांच्या ढिगाऱ्यात,


१३ जून च्या स्कूल युनिफोर्मचा वास हरवला .


बासमतीच्या मंद घमघमाटात ,


... रेशनच्या भाताचा सुवास हरवला .


Dark Fantasy च्या जमान्यात

,
Parle च्या sharing चा आनंद हरवला.


Dairy मिल्क भपकारयात,

लिमलेटच्या गोळ्यांचा छंद हरवला.

सुट्ट्यांच्या दुष्काळात,

मामाचा गाव हरवला.

Kelloggs च्या ब्रेकफास्ट मागे लागून,

नाश्त्याचा चहा अन पाव हरवला .

नात्यांच्या सुपर मार्केटमध्ये,

आपुलकीचा सहवास हरवला.

नाण्यांच्या खूळखूळाटात,

माणसांचा आवाज हरवला ...