Monday, April 23, 2012

खरच..आता तू खूप बदललीये ...!

आठवतंय मला आजही ...
मी न बोलताही माझ्या ...
मनातले सारे ओळखणारी तू ..
आज सारे समजूनही ...
न समजल्यासारखे करतेस ...
खरच..आता तू खूप बदललीये ...!

मला भेटल्याशिवाय तुझा ..
एक दिवसही जायचा नाही ...
पण आज तुझ्या भेटीसाठी ..
एक एक क्षण मोजलाय..
पण ..दुरावा हाच मात्र रोजचा सोबती झालाय ...!

न चुकता मला माझा आवडणारा ..
गुलाब देणारी तू ..
हल्ली विसरू लागलीस ..
पण जाऊ दे ग ...मी रमेल ..
त्या जुन्या गुलाबी आठवणीत ..
शोधेल मी तेथे माझा सुगंध कधीतरी ..
माझा जीव रमवण्यासाठी ...!

माझा हात हातात घेण्यासाठी ...
किती बहाणे करायचीस ..
अक्षरश: तडफडायेचीस ..
पण आता ...
कुणी बघेल ..हा बहाणा सांगून ...
टाळायला लागलीस ..
दूर राहू लागलीस आजकाल माझेपासून ..
का ग ..एवढे परक्यासारखी वागू लागलीस ?

पण व्हायचे तेच झाले ..
माझे स्वप्नं अधुरेच राहिले ...
माझे डोळे भरून येणे तुला कधी सहन नाही झाले .
पण आज माझे डोळे अश्रू ने ओलेचिंब झाले ..
आणि तू ..
अगदी कोरडी ठणठनीत निघून गेलीस ..
मला एकट्याला सोडून ..
एकदाही मागे वळून न पाहता ..!

कालपर्यंत फक्त माझी असणारी तू ..
आज दुसऱ्याची झालीस ..
काही तक्रार नाही ग प्रिये ..
तू फक्त खुश राहा ..
तुझ्या खुशीतच मी माझा आनंद शोधलाय ..
जाईल मंदिरात पुन्हा एकदा ..
आणि घालील साकडे ....
कसलाही पाझर न फुटणाऱ्या ..
त्या दगडाच्या मूर्तीला ...
फक्त ..तुझ्या सुखासाठी ..खुशीसाठी .

No comments:

Post a Comment