Monday, April 23, 2012

सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

तुझे सुंदर , नाजूक , मुलायम पाय ..
चिखलाने भिजतील म्हणून ...
सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

तू आणि तुझे रूप पाहिचे आहे मला भिजताना ..
बघायचे आहे तुझ्या ...
ओठावरती ते थेंब हि थांबताना ..!
पाहिचे आहे हळुवार तुझ्या ...
केसावरून पाणी ओघळताना ..म्हणूनच ..
सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

पण तू आलेवर असा बरस ..
कि उशीर होईल तुला घरी निघताना ..
आणि तू अलगद यावीस बाहूत माझ्या ...
स्वतःला सावरताना ...
कर मोठा कडकडाट विजेंचा आज ..
कि तू सोडूच नये बाहू माझे आज ..
सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

बेधुंद होऊन तू बरसत राहा आज ...
तू जवळ असताना ..
जर कमी पडले थेंब आज बरसताना ..
तर घेऊन जा आनंदाश्रू आज जाताना ...!
सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

तुझ्या सहवासाठी माझा प्रत्येक श्वास त्याला देईन ..
आणि बदल्यात फक्त त्याच्या श्रावण सरींची वाट पाहीन ...!
सांगितले आहे मी आज त्या पावसाला ...
नको येउस आत्ताच .........!

येतेय ग आठवण.... तुझी आजही ...

येतेय ग आठवण.... तुझी आजही ...
कुणाचीही परवा न करता ..
कोसळणारा मुसळधार पाऊस पाहताना ..
सहजच हात लांब करून ..
तळहातावरील झेललेले पाणी ..
अंगावर उडत असताना .....!

कायम असते मनात ...
अथांग महासागर एकटा ...
बघत असताना ..
त्याच्या लाटा पायाला स्पर्शून जाताना ...
ओल्या चिंब पावसात भिजताना ...!

येते तुझी आठवण ..
संध्याकाळी गरम चहा पिताना ..
आभास होतो मलाच ..
झाला आहे स्पर्श त्याला तुझ्या ओठांचा .....!

येते आठवण तुझी...
जेव्हा जमून बसतात श्रावणातले ढग ...
बरसण्यासाठी ..
वाटते ...कदाचित वाट पाहत असतील तुझीच ..
माझ्या सारखीच ..!
तुला चिंब -चिंब भिजवण्यासाठी ...!

पण आता ठरवलंय ...
एकदा शेवटचं मागे वळून ..
पुन्हा आता नाही आठवायचे
विसरलेल्या आठवणींना ..
नाही फसायचे पुन्हा एकदा ..
चुकार हळव्या क्षणात ..
नाही बाळगायचे अपेक्षांचे ओझे ..
मनावर पुन्हा ....!

जास्त नाही रेंगाळायचं...
त्या नागमोडी रस्त्यावर ..
नाही घसरायचे पुन्हा त्या ...
निसरड्या वाटेवरून ...
स्वतःच्या हाताने स्वतःला ..
सावरायचे ...
आणि स्वतःचे आयुष्य आपण ..
स्वतःच घडवायचे ...!
आणि रंगीन करायचे आपले आयुष्य ...
त्या सप्तरंगी इंद्रधनूप्रमाणे ...!

पुन्हा.. फुलेल का आपली प्रीत ....?

आठवतंय तुला ..एकमेकांचा
निरोप घेताना मन भरून आलं होतं ..
डोळ्यातले पाणी पापणीआड दडवून ..
खोटं खोटं हसलो होतो ..
नातं टिकवायचं आपण आयुष्यभर ..
असं मनोमन ठरवलं होतं ..!

सोबत आहे आपल्याला
एकमेकावरील विश्वास आणि प्रेमाची ..
पण मधेच आड आली भिंत ..
घरच्यांच्या प्रतिष्ठेची ...
कदाचित ..त्यांचेसाठी तुला ..
दुसऱ्याशी लग्न करावे लागले ..
तुझा सर्वस्व असणाऱ्या मला ..
त्यांचे साठी दुखवावे लागले ...!

सहन झाले नाही मला ..
दुखवू हि नये तुला म्हणून ..
मी मरणाचा विचार केला होता ..
पण तुझा विचार केल्यावर ..
आपोआप पाऊल अडले माझे ..
फक्त ...तुला दिलेल्या वचनांसाठी
मी हेही सहन करेल ...
जगेन मी ...
जगेन कसा ? रोज तिळ तिळ मरेल ...
तू माझी असतानाही ..
तुझा विरह सोसेल ....!

तुझ्या आठवणीत जगताना ..
कधी कधी मी रडतानाही हसेल ..
ओढ असेल तुझ्या मिलनाची ..
वाट पाहत असतील डोळे ..
फक्त तुझ्या येण्याची ...
मला काही कळत नाही
हि माझ्या प्रेमाची हार कि जीत ...
प्रिये ...सांग न मला एकदा ....
पुन्हा.. फुलेल का आपली प्रीत ....?

जेव्हा कुणीतरी अनोळखी ..

जेव्हा कुणीतरी अनोळखी ..
तुम्हाला समोर दिसते ...
जेव्हा तिची नजर ..
प्रथमच एका नजरेशी भेटते ..
लक्ष फक्त तिकडेच द्या ...
जे तुमचे हृदय बोलते ...!

या प्रक्टीकॅल दुनिया पेक्षा अनुभवा ..
एक वेगळीच दुनिया ...
लक्षात ठेवा ..
Love at First Sight ...पहिल्या प्रेमाची ..
हीच आहे किमया ...
होऊन जा बैचेन ..
तिच्या रम्य आठवणीत
केवळ तिला पाहण्यास ..
हळूच घ्या मिठीत ..
ती स्वप्नात आल्यास ...
अनुभवा तिचा तो उबदार स्पर्श ..
हळूच विचारा मग मनाला ..
किती रे झाला हर्ष ....!

गोड आठवणीत तिच्या होऊन जा बेधुंद
श्वासात तुमच्या दरवळू द्या ..
फक्त तिचाच सुगंध ..
भेटून एकदा तिला निवांत ..
घ्या जवळ तिला ..अन
सांगा एकदा मनातलं...
अशक्य असं काहीच नाहीये ...!

खरच..आता तू खूप बदललीये ...!

आठवतंय मला आजही ...
मी न बोलताही माझ्या ...
मनातले सारे ओळखणारी तू ..
आज सारे समजूनही ...
न समजल्यासारखे करतेस ...
खरच..आता तू खूप बदललीये ...!

मला भेटल्याशिवाय तुझा ..
एक दिवसही जायचा नाही ...
पण आज तुझ्या भेटीसाठी ..
एक एक क्षण मोजलाय..
पण ..दुरावा हाच मात्र रोजचा सोबती झालाय ...!

न चुकता मला माझा आवडणारा ..
गुलाब देणारी तू ..
हल्ली विसरू लागलीस ..
पण जाऊ दे ग ...मी रमेल ..
त्या जुन्या गुलाबी आठवणीत ..
शोधेल मी तेथे माझा सुगंध कधीतरी ..
माझा जीव रमवण्यासाठी ...!

माझा हात हातात घेण्यासाठी ...
किती बहाणे करायचीस ..
अक्षरश: तडफडायेचीस ..
पण आता ...
कुणी बघेल ..हा बहाणा सांगून ...
टाळायला लागलीस ..
दूर राहू लागलीस आजकाल माझेपासून ..
का ग ..एवढे परक्यासारखी वागू लागलीस ?

पण व्हायचे तेच झाले ..
माझे स्वप्नं अधुरेच राहिले ...
माझे डोळे भरून येणे तुला कधी सहन नाही झाले .
पण आज माझे डोळे अश्रू ने ओलेचिंब झाले ..
आणि तू ..
अगदी कोरडी ठणठनीत निघून गेलीस ..
मला एकट्याला सोडून ..
एकदाही मागे वळून न पाहता ..!

कालपर्यंत फक्त माझी असणारी तू ..
आज दुसऱ्याची झालीस ..
काही तक्रार नाही ग प्रिये ..
तू फक्त खुश राहा ..
तुझ्या खुशीतच मी माझा आनंद शोधलाय ..
जाईल मंदिरात पुन्हा एकदा ..
आणि घालील साकडे ....
कसलाही पाझर न फुटणाऱ्या ..
त्या दगडाच्या मूर्तीला ...
फक्त ..तुझ्या सुखासाठी ..खुशीसाठी .

Tuesday, April 17, 2012

तुझी आठवण येते तेव्हा..

तुझी आठवण येते तेव्हा..

देवा एकाच मागणी

तिची पापणी भरू दे

माझ्या नावाचा एक तरी थेंब

तिच्या नयनी तरु दे..

रात अशी ही तंद्रित

पापणिहि बघ लवते आहे

ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे

कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे

तुझी आठवण येते तेव्हा

तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो

तु येणार नाहीस माहित असतं

डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..

एकही क्षण नाही जेव्हा

तिची आठवण येत नसेल,

असा एकतरी क्षण असेल

जेव्हा ती मला आठवत असेल

तू समोर असतेस

तेंव्हा बोलू देत नाहीस |

तू समोर नसतेस

तेंव्हा झोपू देत नाहीस ||

तो ढग बघ कसा

बरसण्यासाठी आतुरलाय

तुझ्या चिंब गालावरुन ओघळला

म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय

माझ्या शब्दांना अजुन तरी

काहीच अर्थ नाही.

जोपर्यंत त्या गीताला

तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.

येणारा दिवस कधीच

तुझ्या आठवणीशिवाय जात नाही

दिवस जरी गेला तरी

तुझी आठवण जात नाही.

आज सारे विसरली तू

नावही न येई ओठांवर.....

कसे मानू तू कधी

खरे प्रेम करशील कुणावर......

तेव्हा सागर किनारी साक्षीने

तू घेतल्यास किती शपथा.....

किती मारल्यास मिठया तू

तो चंद्र ढगात लपता........

नजरेत जरी अश्रू असले

तरी ओठावर हास्य असाव

ओठावरच्या हास्यामागे

नजरेतल्या अश्रूना लपवाव.

कसे करू माफ़ तुला

जे घाव तू मला दिले......

घेऊन माझी फूले

तू काटेच मला दिले......

डोळे पुसण्यास माझे

पाऊस धावूनी आला,

थेंब कोणता तुझा नि माझा

हेच कळेना म्हणाला.

आज पुन्हा तुझी आठवण आली

आणि मी उगीच हसु लागलो

खोटं खोटं हसताना...

कळलेच नाही, कधी रडु लागलो...

तुझ्या नि माझ्या वाटा,

एकमेकींशी नेहमीच समांतर

एकत्रच चालतात खर तर,

पण मिटत नाही अंतर

मनातला प्रत्येक क्षण

ओठांवरती येईल का?

ओठांवरील प्रत्येक शब्द

मनातच राहील का?

आठवण काढू नको म्हणालीस

आठवण काढू नको म्हणालीस
तरी ते शक्य आहे का..??
तुझ्या पासून वेगळं होवून
माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का..??
तुझ्या इतक समजून घेणारी मला
दुसरी कोणी मिळेल का..???
आणि जरी मिळाली
तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम
मी तिच्या मध्ये शोधू शकेल का....??
तुझ्या मध्ये मिळणारा आधार
तुझी माझ्यासाठी असलेली काळजी
ह्या गोष्टी मला दुसरी मध्ये नाही सापडणार
कारण..,
तू ति आहेस जिच्यासाठी मी जगतोय
आणि तू म्हणतेस आठवण काढू नकोस......

तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला तरी काही अर्थ असेल का..??

ती त्याला नेहमी ओरडते ... "का रे तू अस करतोस ?

ती त्याला नेहमी ओरडते ...
"का रे तू अस करतोस ?

मी रोज खूप बोलते, अन तू नुसताच शांत असतोस ..
मी तुझी काळजी करते, अन तू हि माझी काळजी करतोस...
काहीही झालं मला, तर पूर्ण जग डोक्यावर घेतोस...

मी रोज तुझी वाट बघते, अन तू रोज उशिरा येतोस..
office असो, कि रात्री online,
तू नेहमीच का अस करतोस?....
का कळत नाही तुला माझ्या वागण्याचा अर्थ,
कि कळून हि न कळल्या सारखा करतोस?....

मनातल्या भावनांना माझ्या,
का समजून हि नसमजल्या सारखा करतोस?...
का करतोस रे अस तू ?
माझा असून हि का नाहीस रे माझा तू ?.... "

हे बोलून तिझे डोळे पाणावतात,
आणि तो तिझे डोळे पुसतो,
तिला पाहून हळूच हसतो...
अन तिला जवळ घेत घेत बोलतो..
"शब्दात सगळ कस सांगू ग तुला,
मनात आहे खूप काही...
वागण्यातून सांगतो जे ,
तुला ते कळत नाही...

चल शब्दात न सांगितलेलं,
आज मी तुला सांगतो,
मनातला गुपित माझ्या ,
आज तुझ्या पुढे मांडतो,
कळत नकळतच जुळल,
नात आपल्या प्रेम, आज मी हे मानतो..
अन तुझ्यावर खरच ग खूप प्रेम करतो मी ...
घे आज मी हे तुला सांगतो...
घे आज मी हे तुला सांगतो... "

हे ऐकून ती स्तब्ध होते,
अन तो तिला मिठीत घेतो..
आयुष्भर साथ देण्याच वाचन,
आज तो तिला देतो..

ll शुभ प्रभात ll

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो , ती एक देवाची सुंदर कलाकृती असते . तो अंधारावर मिळविलेला

विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते . आणि आपल्या

आयुषातल्या नव्या दिवसाची आणि नव्या ध्येयाची सुरवात असते .
ll शुभ प्रभात ll

आठवतेय ती शाळेची घंटा...

***आठवतेय ती शाळेची घंटा...
घंटा वाजली की मन असे फिरायचे,
जाऊन बसावे परत त्या बाकांवरती असा हट्ट करायचे,
ती वेळ आणि ते वय परत नाही येणार कधी,
मग एकटेच ती खंत करत बसायचे...

आज नाहीये काही अधिक पण बाकी सगळे वजा,
वर्गात केलेली मस्ती आणि बाईंनी दिलेली सजा,
Computer आणि Calculater च्या युगात अगदी विसरलोय पाढयांची मजा,
पाढे पाठ नाही झाले म्हणून कधी घेतलेली रजा...

आज ऑफिसच्या कामातून वेळ पुरतच नाही,
भंडावले डोके काही कळतच नाही,
म्हणून आठवतोय ते शाळेतील खेळ,
कधी कब्बडी, कधी खो-खो आणि शाळे समोरील भेळ...

जेव्हा नसायचे वर्गात लक्ष, पण परीक्षेत मात्र झोप उडायची,
मग एन वेळी मित्राच्या साथीने थोड़ी कॉपी करायची,
होइल यावर पास याची खात्री मात्र असायची,
पण तरीही पालक सभेला दांडी मारायची तयारीच असायची...

शाळेत उशिरा येण्याची तशी सवयच होती,
पण शाळा सुटल्यावर पळायची जरा घाईच असायची,

त्या घंटेचा नाद आजही अगदी कानात घुमतोय,
आज शाळा सूटण्याची नाही तर शाळा भरण्याची वाट पाहतोय,
बाल मित्र आणि जुन्या सवंगडयांसोबत हेच गाणे गातोय,
आठवनींच्या विश्वामध्ये तेच दिवस पाहतोय.... आणि फ़क्त उरलेल्या आठवणी चाफतोय....!

"मी आज खूप थकून आलोआहे,

मुलगा नुकताच ऑफिस मधून थकून
घरी आलेला.
त्याच्या वडिलांना दम्याचाआजार
असतो, ते वि...चारतात "बेटा माझे औषधं
आणली काय, काल पासून संपली आहेत."
... मुलगा : "मी आज खूप थकून आलोआहे,
मी उद्या घेवून येईन."
बाप: "ठीक आहे बेटा तू आराम कर, खूप
थकला असशील..!"
(रात्री अचानक
त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो...घरी
औषधं नसल्यानं त्यांना दवाखान्यात नेई
पर्यंत त्यांचा मृत्यू होतो...)
काही दिवसांनंतर मुलाला त्याच्या रूम
ची सफाई
करतांना जुनी डायरी सापडते.ती त्याच्या वडिलांची असते.
त्यात त्याला ३० वर्ष अगोदरची एक
लिहिलेली नोंद सापडते, ती असते..
"आज माझ्या सोन्याला ताप आला होता,
'Taxi' न मिळाल्यामु ळे व दवाखान्याच
ी लिफ्ट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर
नेतांना थोडा त्रास झाला, पण माझं बाळ
आता शांत झोपी गेला आहे..(वेळ : रात्री २
वाजता..)"
त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले
पण ...आता सर्व संपले होते.
प्लीज नेवर हर्ट युअर पॅरेंटस... .व्हाटेवर यु
आर...इज ओन्ली बिकोझ ऑफ देम...!

हृदय स्पर्शी प्रेम कथा............ ♥♥♥

कुठे होतास तू, तुला अक्कल आहे का, गेले दोन तास मी सारखी तुला कॉल करतेय,
बघ तुझ्या मोबाईल वर ७०-८० मिस-कॉल असतील.तुला कशी रे जरासुद्धा माझी काळजी नाही.
काय समजतोस तू कोण स्वताला? अग हो हो हो, किती ओरडशील मी तरी काय करू मला नाही जमल फोन उचलायला, काही प्रोब्लेम होता... मला माहित आहे रे, तुला नेहमीच प्रोब्लेम असतात, खोटारडा आहेस एक नंबरचा, हल्ली खूप खोट बोलतोस माझ्याशी बसला असशील मित्रांबरोबर टवाळक्या करत आता लग्न झालाय तुझ लहान नाहीस अजून. सोड न राग आता ये न मिठीत, मला माहित आहे तुझा राग माझ्या मिठीत आल्यावर पटकन पळून जातो...चुमंतर..... मी नाही येणार, सोड मला, मला नाही यायचय मिठीत... सचिन आणि सवी... एका वर्षापूर्वी दोघांचा प्रेम विवाह झाला,प्रेम खूप होत दोघांच एकमेकांवर पण सतत अशीच भांडण चालू असायची, जास्त गंभीर नसायची पण. कॉलेजपासून सचिन सवी वर खूप प्रेम करत होता, तिचाही त्याच्यावर खूप प्रेम होत, शिक्षण संपल्यावर सचिनला एक चांगली नोकरी मिळाली, स्वताच्या पायावर उभा राहिला आणि त्याने सविला डायरेक्ट लग्नासाठी मागणी घातली. तिने त्याला होकार दिला आणि त्याचं लग्न झाल. "अग मला वाटल आपल्या सकाळच्या भांडणा नंतर तू आज तुझ्या आईकडे जाशील, आणि मग मी एकटाच असीन घरात, म्हणून मी तुला ऑफिस मधून निघताना कॉल नाही केला. आणि ज्यावेळी तुझा फोन येत होता मला वाटल अजून भांडशील त्यापेक्षा डायरेक्ट घरी जावूनच तुझा राग घालविण म्हणून हे बघ किती डेरी-मिल्क्सची चोक्लेट्स आणलीत तुझ्यासाठी." "मला नकोयत ती...आणि मी काय सारखी भांडतच असते कारे तुझ्याशी? मला काही दुसरे उद्योग नाहीत का? मला वाटल मी सकाळी जरा जास्तीच नाटक केली, तू रागावला असशील माझ्यावर म्हणून मी पण तुझ्या आवडीची चायनीज डिश बनवण्याची तयारी करून बसली होती, मला वाटल विचारव तुला, कि तू कधी येतोयस म्हणजे तुझ्यासाठी गरमागरम बनवल असत." "आता हे मला माहित होत का, तूच एक एसमेस करून सांगायचास ना हे. मग मी ऑफिस मधून लवकर निघून आलो असतो माझ्या लाडक्या बायकोसाठी, आतातरी ये ना मिठीत. नाही म्हणजे नाही.... मी नाय येणार जा." "त्यासाठी तर मी आलोय ना इथे..." "काय? तू मला मिठी मारण्यासाठी इथे आला आहेस का? मला आधी संग तू कुठे होतास इतका वेळ ते, अन तेही खर खर संग..... "बर मग आईक. मी ऑफिस मधून थोडा अर्धा-पावून तास उशीरच निघालो, निघायच्या आधीपासूनच तुझा कॉल येत होता, मला वाटल तू आता रागावशील आणि मी लेट झालोय म्हणून अजून भाद्क्शील, म्हणून मी फोन नाही उचलत होतो. मी विचार केला फटाफट drive करून अर्ध्या तासात घरी पोहचेन हे चोक्लेट्स घेवून. पण काय करू नेमका पावूस सुरु झाला. पावसाचा जोर इतका वाढला कि मला पुढच नीट दिसतही नव्हत, आणि तेवड्यात अचानक समोर एक ट्रक रस्त्यात बंद पडलेला दिसला पण मला काही कळायच्या आत माझी कार त्या ट्रक वर जावून जोरात आदळली. माझ्या कारचा पुढून पूर्ण चेंदामेंदा झाला आणि काचा माझ्या तोंडात आणि बाकी शरीरात घुसल्या, त्यावेळी पण तुझा फोन वाजत होता पण ह्यावेळी मला तो उचलायचा होता पण माझे हात निकामी झाले होते मी प्रयत्न करून सुद्धा फोन उचलू नाही शकलो. आणि पुढच्या पाच मिनिटात काय झाले मला काहीच कळले नाही... कोणी एक भला मोठा माणूस माझ्याजवळ आला आणि मला त्यातून अलगद उचलून वरती वरती खूप वरती घेवून गेला." सवी खूप जोरात किंचाळून झोपेतून जागी झाली, तिला पडलेलं हे भयानक स्वप्न होत. सवी खरोखरच झोपताना सचिनशी भांडून झोपली होती आणि तिला अशीच सवय होती जर भांडण झाली असतील तर खूप फोन करत बसण्याची आणि अजून ते भांडण वाढवण्याची. तिने सचिनला एक घट्ट मिठी मारली आणि खूप रडायला लागली, तो झोपेतून जागा झालाच होता तिची किंकाळी आईकून. तो हि घाबरला होता आणि तिला विचारात होता... "अग सवी काय झालाय, तुला बर नाही वाटत आहे का? काही खराब स्वप्न पडल का? अग शोना बोलना....काय झाल? थांब मी पाणी आणतो तुझ्यासाठी." "हे घे पाणी, पी. आता संग काय झाल?" मी नाही वाद घालत बसणार यापुढे तुझ्याशी, आणि तुही नको माझ्याशी वाद घालू, आणि कधी झालाच ना एखाद भांडण तर त्या वेळी आपण ते फोन वर अजिबात नाही बोलायचं, खरतर मीच नाही करणार यापुढे कधी कॉल जर भांडण झालाच तर. सामोरा समोर बसून आपण भांडण मिटवू.... "
i love u मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय एक सेकंद सुद्धा" असे बोलत तिने पूर्ण स्वप्न सांगितले सचिनला... "i love u tooo .......मी राहु शकणार आहे का कधी तुझ्याशिवाय...बावळट कुठली." ♥♥♥

आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल

एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबा......त आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.

एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही . रागाचा एककटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो.""कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील? मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही?मला तू अजिबात आवडत नाहीस.''वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्‍या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.

त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे.
त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो.

एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो,""कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.''
""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,''असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो.
काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो.
संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.
तो वाचू लागतो,

""... मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही."तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,'असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस...''

पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्‍चात्ताप झाला, तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला; पण आता त्याचा काय उपयोग होता??

मित्रानो आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.
पण..
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका;
कारण जीवनात
एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल;
... पण

आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल

काल ती मला म्हणाली.,

"तुला कधी स्वप्न तुटायची भीती नाही वाटत.......?
उंच मनोरे तू स्वप्नांचे बांधतोस..........,
ते कधी कोसळायची भीती नाही वाटत ...........?
...................
...................
मी फक्त हसलो, आणि तिला म्हटले
"अगं तुझ्या स्वप्नातच तर माझे जग आहे....
हे आयुष्यच स्वप्नांच्या हवाली केले आहे
त्यांच्यातच जगणे आणि
त्यांच्यातच विलीन होणे आहे....."


"केवळ एकच क्षण तुझ्यासोबत जगायचा आहे
मग नंतर.... तो स्वप्नांचा मनोरा
माझ्या सकट कोसळला तरी चालेल ..........!!!"


..............
................
"इतका कसा रे स्वप्नाळू तू ?........
इतकी सुध्दा स्वप्ने पाहू नयेत कोणाची.......
किती रमशील स्वप्नांच्या दुनियेत?"
"एक दिवस मी जाईन तुला सोडून.....
मग काय करशील हं?..... "
"आता अजिबात स्वप्ने पाहू नकोस माझी...... "


असं कालच माझ्यावर चिडून मला म्हटली होतीस
आणि............................

......................
"काल देखील रोज रात्री प्रमाणे
तुझी असंख्य स्वप्ने .....
माझ्याकडेच पाठवली होतीस....
........
........
अगदी न चुकता..............." :)