तुझी आठवण कधी,
खूप रडवते..
जे कधी घडणारचं नाही,
असे स्वप्न देते..
आसवांचे असंख्य,
ठिपके डोळ्यांत देते..
अलवार जाणीवेच्या झुल्यावर,
एकटे सोडून जाते..
वेदनेच्या जंगलात हृदय हाती,
घेऊन फिरावे लागते..
काही नाही जरी बोलली तरी,
तू खूप काही बोलून जाते..
आणि.
हात पुढे करण्याआधीचं,
तू खूप दूर खूप दूर गेलेली असते.. ♥♥♥
No comments:
Post a Comment