Tuesday, March 20, 2012

ती होती साडीत,

ती होती साडीत,
मी होतो गाडीत..

ती होती साडीत,
मी होतो गाडीत..

प्रेम केलं वाडीत,
जीव दिला खाडीत.......



विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.






एक मुलगा एका मुलीला प्रपोस करतो
ती त्याला नकार देते
पण तो दुखी होत नाही..............
मित्र त्यला विचारतात तुला काही भावनाच नाहीत का ??????
तुला दुख झाले नाही का ???????????
मुलगा : मी कशाला दुखी होवू ?
मी एकीला हरवलं जी माझ्यावर प्रेम करत नव्हती .....good morning!!!!!!!!!!!!!!!!!!1
पण
तिने तर असा एक माणूस हरवला जो तीचावर खप प्रेम करतो
बरोबर असेल तर like मारा ...

...killer...chiller....joke....::

पोरगी पटली की नाही हे ओळखायचं कसं?
तिच्यामागून गुपचूप जा. ''भौ...'' करून तिला घाबरवा.
ती नंतर हसली, तर समजा पटली...
... ... आणि संतापली, तर लगेच म्हणा...
...'' दिदी घाबरली!!!!!'



एकदा मक्या आणि त्याचा मित्र swimming करत
असतात..
मक्याचा मित्र : यार मक्या, तू तर एकदम
भारी पोहतोस राव !!!... कुठे शिकलास?....
मक्या (खूप विचार करतो) : अं SSSSSSSSS ....
हां आठवलं.....
मक्याचा मित्र : कुठे ???....
>
>
>
>
>
मक्या : पाण्यात !!!!

जोक आवडला का नाय..??



प्रेयसी
प्रियकराच्या छातीवर डोके ठेवून,
"जानू, किती कठीण आहे रे तुझे ह्रदय.."
... प्रियकर- "प्रिये,
ते माझे ह्रदय नसून,
खिशात
ठेवलेली चुन्याची डबी आहे.."





GIRL: जानु मला की नाही आजकाल झोपच लागत
नाही फार बैचेन झालय मन जगावस वाटत
नाही तुझ्या प्रेमात पुर्ण वेडी झालीये मी .

BOY: ए तुझ्या आईची कटकट डोक्याची आई बहीण एक नको करुस.....
DOCTOR कडे जा ही डेँगु ची लक्षणे आहेत.




जोशी सर : बंड्या मी आता काहीही प्रश्न विचारला की तू त्याचं उत्तर पटकन द्यायचं, काय?.

बंड्या : हो सर.

जोशी सर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण?
...
बंड्या : पटकन..!!!




एक सरदार आपल्या प्लॅटूनचं नेत्तृत्व करीत सिमेवर लढत
होता. अचानक त्याच्या एका जवानाने घाई घाई येवून
त्याला एक बातमी सांगीतली -

जवान - '' सर एक वाईट बातमी आहे... ''

सरदार - '' काय बातमी आहे ?''

जवान - "" सर दुष्मनांनी आपल्याला चारही बाजुने घेरले आहे ''

सरदार - '' अरे हे तर अजुनच चांगलं झालं, आता आपण
चारही बाजुने कुठेही गोळीबार करु शकतो.

आहे एक वेडी मुलगी

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?

आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते
मला,की त्यापेक्षा जास्त?

तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!

माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?

''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!

तुझी आठवण कधी, खूप रडवते..

तुझी आठवण कधी,
खूप रडवते..

जे कधी घडणारचं नाही,
असे स्वप्न देते..

आसवांचे असंख्य,
ठिपके डोळ्यांत देते..

अलवार जाणीवेच्या झुल्यावर,
एकटे सोडून जाते..

वेदनेच्या जंगलात हृदय हाती,
घेऊन फिरावे लागते..

काही नाही जरी बोलली तरी,
तू खूप काही बोलून जाते..

आणि.

हात पुढे करण्याआधीचं,
तू खूप दूर खूप दूर गेलेली असते.. ♥♥♥

तिने नाही केले प्रेम म्हणून

तिने नाही केले प्रेम म्हणून
मी का प्रेम सोडावे

असेल ताकद माझ्या प्रेमात तर
तिला पण माझ्यावर प्रेम जडावे


चोरी करायला आलेल्या चोरांनी तिजोरीवरील पाटी वाचली, अन हसू लागले.

पाटी अशी होती. “लक्षात ठेवा, पैसा हा घरचा पाहुणा आहे !”

एका चोराला गंमत करण्याची लहर आली.

त्याने पाटीखाली लिहिले, “काळजी करू नका ! तुमचा पाहुणा आमच्याकडे खुशाल आहे.”

एका मुलीने देवाला विचारलं प्रेम काय असत

एका मुलीने देवाला विचारलं प्रेम काय असत ?
देव म्हणाला
बागेतून एक फुल घेऊन ये.
ती मुलगी फुल आणायला गेली ,
तिला एक फुल आवडल ,
... पण तिला त्याचापेक्षा सुंदर फुल हव होत ,
ती पुढे चालली गेली ,
पण तिला चांगल फुल नाही मिळाल ,
जेव्हा ती परत तेच फुल आणायला गेली ,
तेव्हा ते फुल तिथे नव्हत ,
तिला खूप पश्चाताप झाला ,
तिने देवाला येऊन सांगितलं ,
तेव्हा देव म्हणाला ," हेच आहे प्रेम "
जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असतं ,
तेव्हा त्याची कदर नाही करत ,
पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय
असत ....!!!

वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे

वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील चोकलेत काढणे पण तरी त्याचे नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे. ♥
१० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श. ♥
१५ वर्षाची मुलगी ...:- प्रेम म्हणजे, आम्ही शाळा बुडवल्या मुळे पकडले गेल्यावर त्याने स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा. ♥
१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप समारंभात त्याने मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा. ♥
२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट. ♥
... ... ... २६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने मला लग्ना साठी केलेली मागणी. ♥
३५ वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, मी दमले आहे हे बघून त्याने स्वताहा केलेला स्वयंपाक. ♥
५० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद. ♥
६० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्या जन्मात लवकरच भेटण्याचे दिलेले वचन

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे
काही विसरायला तयार असते....

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका दुरावू जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून
दुरावायला तयार असते....
... ...
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका दुखवू जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त
जपते......'

|| जय जय रघुवीर समर्थ |

||सार्थ मनाचे श्लोक || ||२२||
मना सज्जना हीत माझे करावे |रघूनायका दृढ चित्ती धरावे ||
महाराज तो स्वामि वायुसुताचा |जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ||२२||

अर्थ : - मागला खोटेपणा टाकून देताना नवी काही तरी शुध्द वस्तु त्याला लावावी लागते.सुवर्ण अग्नीने शुध्द करतात. पाणी तुरटीच्या स्पर्शाने शुध्द करतात. पण अशी कोणती वस्तु आहे की, ती मनाला लावली म्हणजे ते शुध्द होईल? मनाचे पाप चंचलतेत असते. त्याच्या शुध्दीसाठी बलवान, अचंचल, दृढनिश्चयी विचाराचे प्रतीक जोडावयास हवे. ते प्रतीक म्हणजे राम.
श्रीरामदासांनी या श्र्लोकातील पहिली ओळच सूक्ष्म सत्याला भिडविली आहे. मनाला त्याच्याही पलीकडल्या गाभ्यात जाऊन रामाचा स्पर्श पोहचविण्यास संागितले आहे. आपल्या मनाला आपणच बजावायचे, ‘आता आपले हित आपणच करून घ्यावयाचे आहे. ‘ मनाच्याही मुळाशी राघव नेऊन ठेवला म्हणजे बाकी फळापर्यंत राघवच पोहचणार.
श्र्लोकाच्या तिसर्या ओळीत श्रीरामबलाचा एक पुरावा दिला आहे. वायुपुत्र बलवंत हनुमान म्हणजे तेज आणि शक्तीचे प्रतीक. त्या हनुमानानेच रामाला स्वामी मानले आहे, शक्तिदाता मानलेले आहे. यावरून रामाची शक्ती केवढी थोर, केवढी मूलभूत आणि महान असेल! स्वर्ग असो, पृथ्वी असो, पाताळ असो, उंचापासून खोलापर्यंत कोठेही रामशक्तीचा आश्रय शुध्द करील. त्रासापासून सोडवील. हे चौथ्या ओळीचे कथन आहे. त्याची तर्करेषा पहिल्या तीन ओळींशी सुसूत्रच आहे

|| जय जय रघुवीर समर्थ |

माझी आठवण कधीतरी येईल तुला'

माझी आठवण कधीतरी येईल तुला'
माझी आठवण कधीतरी येईल तुला
जुन्या आठवणीत मग तू शोधशील मला.....
कुणालातरी माझी आठवण सांगतानातू हसशील
पण त्या आठवणीत मला पाहताच तू रडशील.....
आठवेल तुला समुद्र किनारी आपल्या दोघांच फिरन
तुझ्या थरथरत्या स्पर्शात मी स्वता हरवून जान.....
तू माझा हातात हात घेउन अनेक स्वप्न सजवन
माझ्या डोळ्यात पाणी येताच मला हसवण.....
आठवेल तुला आपल्या प्रेमातला तो जुना पाउस
एकाच छत्रीत पाउसात भिजणारी ती आपली हाउस.....
ओल्या चिम्ब तुझ्या स्पर्शात अंगावर येणारे शहारे
काळ्या गर्द वातावरणात मोहरूनगेलेले ते अंग सारे.....
माझी आठवण येताच मी जवळ असल्याच तुला भासेल
तुझ्या डोळ्यातून निघालेला अश्रुचा प्रतेक थेंब मी असेल.....
तू एकटी बसल्यावर आठवेल तुला प्रतेक क्षण
त्या क्षणांमधे दिसेल तुला माझ तडफडणार मन.....
माझी आठवण कधीतरी येईल तुला
व्याकुळ होउन तुझ मन शोधेल मला

एक मैत्री नावाचे गाव

नितळ नि:स्वार्थी पारदर्शक
तिथे नसतो कपटाला वाव
एकमेकांचे सुख वेचतात जिथे
आहे असे एक मैत्री नावाचे गाव

काही मित्र कट्ट्यावर बसलेले असतात,

काही मित्र कट्ट्यावर बसलेले असतात,
इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल
वाजतो....
मुलगा : हेल्लो..
गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे,
... मी ५००० रु. पर्यंतची सिल्क सुट घेऊशकते
का!
मुलगा : हो जानू घेणा.
गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पण घेऊ
कारे ???
मुलगा : हो जानू १ नाही २-४ घे...
गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझा क्रेडीट कार्ड
माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊ ना???
मुलगा : होग चालेल, घे तू...
गर्लफ्रेंड : लव यू जानू... बाय... (फोन कट)
सर्व मित्र : साल्या तूला वेड लागलय
कि तु चडलाय???
कि तूला आम्हाला दाखवायचे आहे,कि तू
तुझ्या गर्लफ्रेंड ला किती प्रेम करतो ???
मुलगा : ते सोडा रे, हे सांगा हा मोबाईल
आहे कोणाचा ???
"हर एक फ्रेंड कामिना होता है":))

तुझा messsssage...***

*** तुझा messsssage...***
कधी कधी मला तुझी खूप आठवण येते..
मग तुझ्या आठवणींनी व्याकूळ होऊन..
मी..
मी.. दुसरं काही नाही,
तुला एक message करते..
आठवण करुन देण्यासाठी,
की मी इथेच आहे..
पॄथ्वीतलावर..,
मग तुझ्या msgची वाट पाहण्याचा सुरु होतो खेळ..
जेव्हा जेव्हा msg beep होतो..
वाट्तं,
तुला आलीच शेवटी माझी आठवण..
मी वेड्यांसाऱख अधीर होऊन,
लहान मुलाच्या उत्साहाने inbox पाहावा तर..
तुझा msg नसतोच..
मग पुन्हा तुझ्या नावाचा जप(की शिव्यांच्या लाखोल्या?)..
messages येतच राहतात..
पण त्यातला एकही नसतो तुझा..
आणि मग पारा चढत जातो माझा..
जेव्हा अगदी टॉकाला पोहोचतो..
तेव्हा एक मस्त msg beep होतो.,
अन् मग निराश मनाने शेवट्चं पाहावं तर...
तर..
...
तर..
तो offersवालाच message असतो,
शेवटी अनावर होतो माझा राग..
अन् रुसून बसते मी तुझ्यावर..
आणि थोड्या वेळाने ..
तुझ्यावरला राग विरघळायला लागतो..
तेव्हा येतो ..
तुझा messsssageeee..

** परीक्षा***

** परीक्षा***
Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो..च जातो?

जे आवडत असत ते कधी मिळत नसत

जे आवडत असत ते कधी मिळत नसत
हिसकावून घेऊन ते आपल कधी होत नसत

प्रयत्न केला मागण्याचा
पण यश मागून मिळत नसत
...
शेवटी नशिबात आहे तेच होते
म्हणून नशीब खोटे आहे असे माणूस म्हणत नसतो

जिंकण्यासाठी प्रयत्न प्रत्तेकाकडे असतो
म्हणून प्रयत्न तो कधी सोडत नसतो

वाहणा-या मनाला थांबवणार

वाहणा-या मनाला थांबवणार
भरकटलेल्या जिवनाला दिशा देणार.
कोणीतरी आपलं असावं ..........

रुतताच काटा पायात पाणी डोळ्यात यावं
व्याकुलेल्या नजरेने गर्दीत शोधावं.
कोणीतरी आपलं असावं..................

वाहणा-या अश्रूला डोळ्यातच थांबवणार
चुकलेल्या पावलांना पायवाट दाखवणार.
कोणीतरी आपलं असावं .......................

दूर असूनसुद्धा जवळ भासणार
मृगजलागत डोळ्यासमोर दिसणार.
कोणीतरी आपलं असावं.....................

जिवनाच्या शेवटपर्यंत सोबत असावं
मरण सुद्धा मिठीत त्याच्या यावं.
कोणीतरी आपलं असावं ............................ ♥
शूभ प्रभात..♥

किती साधी ग तू, ना सजनं ना मुरडनं,

किती साधी ग तू,
ना सजनं ना मुरडनं,
ना लटके झगडणं,
किती सच्ची ग तू..
जे काही असेल ते आतून सजलेलं,
सकाळचं ऊन जसं पावसात भिजलेलं..
किती मन लाऊन जगणारी तू,
किती जीव लाऊन जगणारी तू,,
तुझे ओझरते देखावे जगणं शिकवून जाणारे..
तुझे हसते नजारे हसणं शिकवून जाणारे...
किती वार्यासारखी तू,
किती पाण्यासारखी तू,
वाहत जाणारी .. आपल्याच कलेनी,
वाहावत नेणारी .. स्वैर ओढ्यासारखी..
एवढा का हेवा वाटावा,
तुझ्या जगण्याचा..
तुझं जग बघण्याचा..
एकदा तुझ्या डोळ्यांनी ही दुनिया बघावी म्हणतो..
ती सुंदर भासेल.. नव्हे असेलच!
तुझ्या हातात हात घेउन डोळ्यात हसावं म्हणतो..,
पाणी गालांवर असेल.. किंवा रुसेलच...
तुझ्या असण्याचा आनंदोस्तव जगायचाय..
तुझ्या हसण्याने, तुझ्या सोबत असण्याने...

तुझ काय गं

तुझ काय गं
तु येऊन पुन्हा जाशील
सुखावलेल्या जखमां वरच्या खपल्या
पुन्हा काढुन जाशील.....!
तु दिलेल्या जखमांदेखील
हव्या हव्याश्या वाटतात
कदाचित त्या जखमांमुळेच
तुझ्या आठवणी ताज्या राहतात...
तुस्व:त बद्दल किती सहज सांगुन गेलीस
अन् माझ्या बद्दल आयकायचं विसरुनच गेलीस...
माझ ह्दय तर घेऊन गेलीसच
पण तुझ माञ घ्यायचं विसरुन गेलीस..

सगळ्यांना हसवतो,अन नेहमीच तो उदास असतो

सगळ्यांना हसवतो,अन नेहमीच तो उदास असतो...
सगळ्यांचे डोळे पुसतो, पण नेहमीच तो रडत असतो...
विचारात हरवलेल्याला दिशा दाखवतो,
पण स्वतः दिशाहीन विचारात फिरत असतो...
दुख असेल तर जाणून घेतो,
दुखी त्या चेहऱ्यावर थोड हसू हि देतो,
पण स्वतःच दुख नेहमीच तो लपवतो..
धावतो तो सगळ्यानसाठी,
अन सगळ्यांचा आवडता हि तोच असतो...
पण तरी हि आयुष्यात,
तो नेहमीच ...
....
एक एकटा एकटाच असतो...
एक एकटा एकटाच असतो...

गरज आहे आज मला………

गरज आहे आज मला………
त्या तुझ्या आधाराची
अडखळनारे पाऊल माझे
सावरणाऱ्या तुझ्या हातांची

… … गरज आहे आज मला………..
त्या तूझ्या मोहक मिठीची
दडपण असता या मनी
तुझ्यात स्वतःला सामावून टाकणाऱ्या त्या बाहूंची

गरज आहे आज मला…………..
त्या तुझ्या कोमल प्रीतीची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची

गरज आहे आजहि मला……….
माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची
सारे जग असुरक्षित वाटताच
तू जवळ आहेस या जाणिवेची

गरज आहे मला
खूप गरज आहे….

तुझ्या लपलेल्या आठवणीना

तुझ्या लपलेल्या आठवणीना
परत कधी शोधणार नाही
तुझ्या जपून ठेवलेल्या
त्या अनमोल शिदोरीला
आता कधी सोडणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!

ती देलेल्या प्रत्येक क्षणांना
परत कधी डिवचणार नाही
तू उराशी बाळगलेल्या
त्या जिरकाल क्षणांना
आता कधी छेडणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!

तू भेटलेल्या स्थळांना
परत कधी भेटणार नाही
त्यांच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या
आपल्या त्या गोड गाठी-भेटीना
आता कधी कडवठ करणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!

तू जागवलेल्या भावनांना
परत कधी झोपवणार नाही
त्यांनी भरून आणलेल्या
दोघा मधल्या अतुठ प्रेमाला
आता कधी तोडणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!

तू जाणवलेल्या जीवनाला
परत कधी विसरणार नाही
त्याने भोगायला लावलेल्या
त्या नियतीच्या सत्वपरीक्षेत
आता कधी नशीबवान ठरणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!

तुला दिलेली वचनं

तुला दिलेली वचनं

मी माझ्या मनापासून पाळले होते......

तू नाही ठेवली किम्मत त्यांची

म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले होते......

झाली होती गर्दी फार

जळतान्ना मला पहायला...

काही जनांना घाई फार

राख़ नदित वहायला...

आग पूर्ण विझली तरी

प्रेत माझे जळतच होते...

राख़ वेचनार्यांचे काल

हाथ आगिने सलत होते...

राख़ अजूनही गरम होती

'' उद्या वाहू '' म्हणुन गेले...

अश्रु दोन गालुन

मागच्या मागे वलुन गेले ....

मग भल्या पहाटे कुणीतरी

तिच्या स्पर्शासम उब देत होतं...

मी उठून पाहिले तर

शेजारी एक प्रेत जळत होत्तं...

आलेत मागोमाग राख़ वेचनारे

वेचुन मला त्यांनी घरी नेले...

सोबतच वाहुया आतातरी

अनोळखी कुजबूज करून गेले ...

नदिकाठी आज माझ्या

एक राख़ मडकी होती शेजारी...

माझ्या सारखेच तिचे रूप

जणू काही म्हणत होती बिचारी ...

नदीमधे मग त्यांनी

वाहिली दोन्ही मडकी होती ...

त्या राखेचा स्पर्श होताच कळल

दूसरी राख़ तिची होती ...........

माझ्या प्रियेची....