आज तुझ्या हातातील बांगड्या..
काही वेगळ्याच रंगत रंगल्या,
माझ्या स्पर्शासाठी त्याही..
हळूच काहीतरी गुणगुणल्या
ती आली online की
माझा पीसी Hang होतो
मनात कससंच होवून
सारंच Zing Zang होतं
...कितीही Alt+Ctrl+Delete केले
तरी Task manager येत नाही
हैराण होतो Refresh करून
Restart चं नावच घेत नाही
Hard disk चा वेग वाढतो
कसले कसले आवाज काढतो
writer सारखा eject होतो
Pen drive पण reject होतो
काय म्हणता तुम्ही,
मी online येणे बंद करायचं....?
अहो मग मी.....
तिच्या शिवाय कसं जगायचं....??
अहो Hang च होतोय ना
काय फरक पडतो.....?
तिच्यामुळेच तर माझ्या
PC चा ह्रदय धडधडतो.....

Tuesday, June 28, 2011
सजवून साज जशी
सजवून साज जशी
रुणझुण सांज तशी, सजनी तू रंगबावरी
सरल वार सुखाची... रिमझिमे जशी
छेडी अलगूज जणू, श्वासातूनी आज कुणी
हरपून भान अशी, मिठी तुझीच तशी
सजना मी सांज सावरी...
नजर तुझी ही प्रिया वेड लावी,
भिरभिरते मी अशी भोवताली,
गोऱ्यागोऱ्या गालावरी आज लाज आली,
अवखळ डोळ्यात ह्या प्रीत गीत झाली,
अशी भूल जीवाला या पडते,
मखमल मनी उलगडते,
काळजाच्या काठावर हलते,
छेडी कुणी तार जशी...
हरपून भान अशी, मिठी तुझीच तशी
सजना मी सांज सावरी...
सरल वार सुखाची... रिमझिमे जशी
छेडी अलगूज जणू, श्वासातूनी आज कुणी
सजवून साज जशी
रुणझुण सांज तशी, सजनी तू रंगबावरी
दव हळवे मी धुके धुंद व्हावे,
बिलगुन राणी तुला पांघरावे,
विसरून थांग सावली तुझीच व्हावे,
अलगद वाटे रे तुझ्यात मी भिनावे,
तुझ्यासाठी अशी तळमळते...
तुझ्याभोवताली घुटमळते...
पुनवेच्या चांदासाठी झुरते...
वेडीपिशी रात जशी,
सजवून साज जशी
रुणझुण सांज तशी,
सजनी तू रंगबावरी
सरल वार सुखाची...
रिमझिमे जशी
छेडी अलगूज जणू, श्वासातूनी आज कुणी
हरपून भान अशी, मिठी तुझीच तशी
सजना मी सांज सावरी...
रुणझुण सांज तशी, सजनी तू रंगबावरी
सरल वार सुखाची... रिमझिमे जशी
छेडी अलगूज जणू, श्वासातूनी आज कुणी
हरपून भान अशी, मिठी तुझीच तशी
सजना मी सांज सावरी...
नजर तुझी ही प्रिया वेड लावी,
भिरभिरते मी अशी भोवताली,
गोऱ्यागोऱ्या गालावरी आज लाज आली,
अवखळ डोळ्यात ह्या प्रीत गीत झाली,
अशी भूल जीवाला या पडते,
मखमल मनी उलगडते,
काळजाच्या काठावर हलते,
छेडी कुणी तार जशी...
हरपून भान अशी, मिठी तुझीच तशी
सजना मी सांज सावरी...
सरल वार सुखाची... रिमझिमे जशी
छेडी अलगूज जणू, श्वासातूनी आज कुणी
सजवून साज जशी
रुणझुण सांज तशी, सजनी तू रंगबावरी
दव हळवे मी धुके धुंद व्हावे,
बिलगुन राणी तुला पांघरावे,
विसरून थांग सावली तुझीच व्हावे,
अलगद वाटे रे तुझ्यात मी भिनावे,
तुझ्यासाठी अशी तळमळते...
तुझ्याभोवताली घुटमळते...
पुनवेच्या चांदासाठी झुरते...
वेडीपिशी रात जशी,
सजवून साज जशी
रुणझुण सांज तशी,
सजनी तू रंगबावरी
सरल वार सुखाची...
रिमझिमे जशी
छेडी अलगूज जणू, श्वासातूनी आज कुणी
हरपून भान अशी, मिठी तुझीच तशी
सजना मी सांज सावरी...
एक होता विदुषक ( लक्ष्मीकांत बेर्डॆस श्रध्दांजली
एक होता विदुषक , नाव त्याचं लक्ष्या..
शांतेचं कार्ट चालू आहे
हा बसला ज्याच्यावर ठपका
मग,चल रे लक्ष्या मुंबईला म्हणत
धुमधडाका ज्याने केला..
हसवलं त्यानं जगाला
बोलक्या डोळ्यांनी,मिश्किल हास्याने
अफलातून बोलांनी,चुलबुल्या स्वभावाने
मोहवलं त्यानं मनाला..
शुभ बोल ना-या म्हणत
सा-यांनी त्याच्यापुढे रगडला माथा
पण त्यानं धांगडधिंगा करत
गडबड घोटाळ्याचा शेजार नाही सोडला..
दे दणादण करत
मारलं त्यानं खलनायकांना
प्रेम करुया खुल्लमखुल्ला म्हणतं
जिंकलं त्यानं प्रेमिकांना..
नायिकेच्या बापापुढे करे तो थरथराट
बनवा बनवी करणा-यांसाठी असे तो खतरनाक
बचतीचे धडे देणारा होता तो चिकट नवरा
बहिणीसाठी विघ्नहर , हाच सूनबाईचा भाऊ होता..
रंगत संगतीनं ह्याच्या जो तो रंगलेला
मस्करीने त्याच्या रसिक झपाटलेला..
पण नियतीने कथेचा सापळा असा रचला
धडाकेबाज विदूषकाचा रोल तिनं काटला..
पण, बजरंगाची कमाल बघा
नियतीलाही बेट्याने हरवला..
अरे,रडवून ‘ जाईल ‘ तो विदूषक कसला ?
पडद्यावरून मनात उतरुन..
मनमुराद हसवत सर्वांना
लक्ष्या तर अमर झालेला..
लक्ष्या अमर झालेला..

स्पर्श तुझ्या हाताचा
धगधगत्या या डोळ्यांमध्ये,
स्वप्न पाहतेस कुणाचे...
मनात माझ्या वसलीस तू...
मंथन-मर्म माझ्या मनाच्या...
तुझ्या शब्दातला स्तब्द पणा,
पुन्हा हृदय घायाळ करून गेला...
स्पर्श तुझ्या हाताचा...
मनाला वेड लावून गेला
स्वप्न पाहतेस कुणाचे...
मनात माझ्या वसलीस तू...
मंथन-मर्म माझ्या मनाच्या...
तुझ्या शब्दातला स्तब्द पणा,
पुन्हा हृदय घायाळ करून गेला...
स्पर्श तुझ्या हाताचा...
मनाला वेड लावून गेला
चिंब मनी आज पुन्हा
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले
वार्यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले
पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले
काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले

तुझ्या पहिल्या हाकेनेच
तुझ्या पहिल्या हाकेनेच,
रोज मला जाग यावी..
तुझ्या आठवणींच्या कुशीत...
रोज रात्री गोड स्वप्ने पहावी
जेव्हा कधी तुला एकटे वाटेल...
तेव्हा मला नक्की साद घाल...
तुझ्या डोळ्यातील एकटेपण,
माझ्या ओंजळीत दान घाल
रोज मला जाग यावी..
तुझ्या आठवणींच्या कुशीत...
रोज रात्री गोड स्वप्ने पहावी
जेव्हा कधी तुला एकटे वाटेल...
तेव्हा मला नक्की साद घाल...
तुझ्या डोळ्यातील एकटेपण,
माझ्या ओंजळीत दान घाल
त्या प्रेमाची आठवण...!
मी बरसलो आज शब्दांतुन ,
तीला एकही शब्द ना कळला कधीमी ओघळलो आज डोळ्यांतुन ,
तीचा थेबंही ना गळला कधी.
सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले मी कोसळलो दरड होऊन ,
तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.
तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्यामी बसलो बाजार मांडून ,
तीने भाव माझा ना विचारला कधी.
आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याचीमी राहीलो कुंपण बनुन ,
तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.
सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या मी जगलो काजवा होऊन ,
तीला उजेड माझा ना दिसला कधी.
आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठीमी राहीलो शिपलं बनुन ,
माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी
मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी मी जळालो पाखरु बनुन ,
तिला एकही चटका ना लागला कधी.
मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावीमी मला दिले आगीत झोकून ,
तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.
आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापामी चाललो स्वप्न मोडुन ,
तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी।

माणूस माझे नाव
माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...

तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
शाळा सुटली....
पाटी फुटली...
मोठे होता होता..काही नाती तुटली...
अन बालपणाची साठी पाटी हि सुटली...
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात मी चिंब ओला झालो होतो...
.
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात मी चिंब ओला झालो होतो...
.
पुढची स्टोरी नंतर सांगतो मित्रांनो...,
...आधी जरा कपडे सुकवून येतो.

तू खुश तर आहेस ना!!
कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झालीस काही कळलेच नाही..
एक एक दिवस जात होता .. अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती ..
कदाचित तुला मी वेडा वाटत असेन.. अन होय मी वेडाच आहे तुझ्याच साठी..
तुझ्या एका प्रेमळ कटाक्षासाठी.. तुझ्या प्रेमळ मिठी साठी..
पण कदाचित ते शक्य नाहीये ... तुला ...
शेवटी मनाला घटत आवळून तुही बुद्धीनेच निर्णय घेतलास ना..!!
आपल ते प्रेम , आपल्या त्या आठवणी..
येवढ्या सहज तू विसरू शकशील..?
कदाचित हो असेल तुझ उत्तर...
पण मनातल्या त्या एकांत कोपरयात माझी जागा कायम असेल
हेही मी जाणतो..
होईल तुलाही कधी तरी पश्चाताप होईल कि ऐकल असतं जर तेव्हाच मनच तर..
पण वेळ गेल्यावर काय करणार..
त्यावेळी कोणाला सांगावस वाटल तरी तुला ते शक्य नाही होणार..!!
आयुष्याच्या एखाद्या वळणावर कदाचित आपली भेट होईलही ..
पण त्यावेळीही मला हेच जाणून घेण महत्वाच असेल कि
कि

तेव्हाही होताच की हा गार पावसाळा
तेव्हाही होताच की हा गार पावसाळा
रिमझिमणा-या सरींचा कोसळणा-या धबधब्यांचा
पण त्याच्यांतली नि:शब्दता कधी जाणवलीच नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस...............
तेव्हाही होतच होती रोज संध्याकाळ
रूपेरी किरणांचा असा तो काळ
पण ती कातरवेळ कधी अनुभवलीच नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस...............
तेव्हाही स्वप्नांच्या देशा जायचे मन
मग मी जगायचो तिथला प्रत्येक क्षण
परतल्यावर कधीच कोणाची आठवण झाली नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस...............
तेव्हाही जीवनाच्या वाटेवर चालतच होतो
कधी सुखात तर कधी दु:खात
पण कधी सोबतीची गरज वाटलीच नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस....

मी फक्त शब्द लिहिले,
डोळ्यातील अश्रू म्हणजे पाणीच असते का?
त्याच्याशिवाय त्यांना काही किंमतच नसते का?
दुखते जेव्हा मन तेव्हा भरून वाहतात डोळे
आनंदाची कहाणीही पाण्यातच सांगतात डोळे
मी फक्त शब्द लिहिले,
त्यांची चारोळी तू केलीस...
मी फक्त ओळी लिहित HOTO..
त्यांची कविता तू केलीस

ओर्कुट
ओर्कुट वर अनेक मुले असतात,
पण जो मित्रांना स्क्रप मधेय (प्रेमाने)शिवी घालुन,
मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो ,
तो मुलगा मराठी असतो...
ओनलाईन अनेक मुले असतात,
पण जो ओफिस चे काम नीट करुन,
मित्र परिवाराशीही बोलतो,
तो मुलगा मराठी असतो...
मेल FWD अनेक मुले करतात,
पण जो मुलींना embarassing वाटेल असे कही FWD करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...
चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात,
पण जो 'I Respect your Privacy'म्हणून,
मुलींना फोर्स करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...
Virtual चाट फ्रेन्डस अनेक मुले असतात,
पण जो 'Whts Real,Virtual ?..Friends Are Forever'असे म्हणतो,

पौर्णिमेचा लखलखीत चंद्र
आठवणीच्या हिंदोल्यांचा एक थेंब बनून येईल ,
हृदयात तुझ्या घर करून जाईल ,
फक्त मनापासून आठवण काढ कधी ,
अमावस्या जरी असली तरी ,
पौर्णिमेचा लखलखीत चंद्र बनून येईल
हृदयात तुझ्या घर करून जाईल ,
फक्त मनापासून आठवण काढ कधी ,
अमावस्या जरी असली तरी ,
पौर्णिमेचा लखलखीत चंद्र बनून येईल
कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं
मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..
कुणी 'orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात..
...प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
कारण सगळे विषय 'chat' वरच संपलेले असतात..
मग 'chat' वर भेटूच " याचं Promise होतं..
आणि संभाषणातून 'Sign out' के लं जातं. ..
'लाल' 'हिरव्या ' दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं...
घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..
'Available' आणि 'Busy' मध्ये
प्रत्येकाचा status घुटमळत राहतो...
आपणहून add केलेल्या मित्रपासून लपण्याकरिता
'Invisible'चा आडोसा घेतला जातो..
ताप आल्याच आजकाल आईच्या आधी 'Facebook' ला कळत..
औषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..
मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
'Net''ची जाळीच का असावी?
कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
'chat' ला गप्पानी आणि 'Smile' ना हास्यानी replace करावं..
शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं....
चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,
मैत्रीला technology पासून जपून ठेवुया ......

फरक कुठे पडला आहे….
लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|
लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|
तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|
लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|
कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|
जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो

Subscribe to:
Posts (Atom)