Tuesday, February 22, 2011

स्पर्श तुझा

कसे सांगू तुजला भेटीने तुझ्या
किती आनंद मिळतो माझ्या मनास...
सरितेला आलिंगन देताना
होत असेल जेवढा सागरास...

मखमली स्पर्श तुझा
अंगावर एक वेगळाच रोमांच फुलवतो...
तुझ्या डोळ्यात माझे प्रतिबिंब पाहून
मी मात्र खूप सुखावतो...

वेळ अतिशय हळू सरावी
हीच बाळगून असतो मनी आस...
काही क्षणांनी दूर जाणार आहेस
ही जाणीव मात्र देते त्यावेळी खूप त्रास...

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
मी ठेवत असतो मनात साठवून...
नसतेस सोबत तेव्हा मग
झोपतो त्यांनाच उराशी बाळगून...

अलिप्त होताना तुझ्याकडे मला
पहावल ही जात नाही...
दु:खी असताना हसर्‍या चेहर्‍याने
निरोप देण मला तरी जमत नाही...

No comments:

Post a Comment