Tuesday, February 22, 2011

तिची आठवण अन ती...

बागेतल्या रोजच्याच ठिकाणी
रोजच्याच वेळी...
मी तिची वाट बघत होतो
रोजच्याच प्रमाणे तिला
आज ही उशीर झाला होता
आणि रोजच्याच प्रमाणे मी ही
पुन्हा पुन्हा घड्याळाकडे बघत होतो ...

ती येण्याआधी मग, रोजच्याच प्रमाणे
आधी तिची आठवण आली ...
मी ही मग सवयी प्रमाणे ...
गेलो आठवणीच्या संगे..
पुन्हा एकदा..
केली सैर आजवरच्या प्रवासाची.....

आलो जेव्हा भानावारती..
जवळ माझ्या ती बसली होती
डोळे मोठे...नाक फेंदारालेल..
माझ्या मनी डोकावली भीती...

चेहऱ्यावर ढळलेली बट...
डाव्या करंगळीने माघे सारून..
जळजळीत नजर माझ्यावर फेकून...
बोलली ती मला....

"आज काय असेल तो
सोक्ष मोक्ष लावून टाक...
कोण तुला जास्त प्यारी
माझी आठवण की मी स्वतः
या प्रश्नाचे उत्तर तू
लगेच मला देऊन टाक... "

मग स्वतःच रुसली..
मान वळवूनं बसली...
पडलो होतो मी संभ्रमात....
इतक्यात...
तिचीच आठवण...खुदकन हसली...

मग बोललो मी तिला
टाकू नकोस अशी तू
धर्मसंकटात मला....
तुझी अन माझी भेट
फ़क्त काही तासांची असते
तुझी आठवणच मग सखे
नेहमी माझ्या सोबत असते
तुझ्या विरहाला तुझी आठवणच
माझ्या पासून दूर ठेवते...
तू नसताना तुझ्याच रूपाने
अगदी नववधु प्रमाणे सजते...
रात्रभर मग तिच्याच कुशीत मी
तुझीच स्वप्ने वेचीत जातो...
बांधून त्यांच्या तोरणमाळा
मी तव आगमनास झुरतं राहतो...

न कळले तुला जे आजवर
ते सांगतो मी आता..

तुझ्याविना नाही सखे
तुझ्या आठवणींचे अस्तित्व ....
अन तुझ्या आठवणींशिवाय प्रिये
कोण सांगेल तुझे महत्त्व ......

कामगार आहे मी, तळपती तलवार आहे.

कामगार आहे मी, तळपती तलवार आहे.....

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे,

थोडे राहिलेले, पाहिलेले, जोखीलेले आहे
माझ्या जगाची एक गन्धवेनाही त्यात आहे
केव्हा चुकलो, मुकलो, नवे शिकलोही आहे
जसा जगात आहे मी तसाच शब्दातही आहे,

रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे
याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती खडगे मी देत आहे,

एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे
सावध असा तुफानाची हीच सुरवात आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा घडणार आहे,


कवी: नारायण सुर्वे

स्पर्श तुझा

कसे सांगू तुजला भेटीने तुझ्या
किती आनंद मिळतो माझ्या मनास...
सरितेला आलिंगन देताना
होत असेल जेवढा सागरास...

मखमली स्पर्श तुझा
अंगावर एक वेगळाच रोमांच फुलवतो...
तुझ्या डोळ्यात माझे प्रतिबिंब पाहून
मी मात्र खूप सुखावतो...

वेळ अतिशय हळू सरावी
हीच बाळगून असतो मनी आस...
काही क्षणांनी दूर जाणार आहेस
ही जाणीव मात्र देते त्यावेळी खूप त्रास...

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
मी ठेवत असतो मनात साठवून...
नसतेस सोबत तेव्हा मग
झोपतो त्यांनाच उराशी बाळगून...

अलिप्त होताना तुझ्याकडे मला
पहावल ही जात नाही...
दु:खी असताना हसर्‍या चेहर्‍याने
निरोप देण मला तरी जमत नाही...

स्पर्श

स्पर्श तुझ्या शब्दांचा
मला कधी ना जाणवला
वाट बघता बघता
प्रत्येक क्षण निसटला
तुझ्या प्रेमाचे शब्द ऐकायला
प्राणाचे मी कान केले
पण तुझ्या शब्दांसाठी
माझे तर प्राणच गेले
स्पर्श तुझ्या शब्दांचा जाणवायला
कडाही डोळ्यांच्या पानावल्या
तुझ्या कोरड्या वागण्याने
भावना सार्या जलुन गेल्या
असे वाटते माझ्यासाठी
रोज रडते आकाश
कधी वाटते सोडून द्यावे
तोडून टाकावे सारे पाश
आयुष्य सारे जलुन गेले
जीवनाची झाली मरुभूमि
तुझ्या मेलेल्या संवेदना
जागवायाला काय करू मी
किती फ़रफ़त होते जीवाची
कुठवर सहन करायची
तुझ्या प्रेमाची वाट बघत
वर्षे अशीच सरयाची....

प्रेम...

प्रेम... एक छान संवेदना....
त्यात तुझ्या नि माझी गुंतल्या भावना,
प्रेम... वाळक्या लाकडाला फुटलेली नवी पालवी..
माझी प्रत्येक रात्र तुझ्या आठवणीत जावी...
प्रेम... निर्जल झऱ्याला आलेली पाणवल..
तुझ्या माझी प्रेमाचे फुललेले प्रेम फुल..
प्रेम... ओसाड जमिनीवर आलेली एक हिरवळ ...
तुझ्या माझ्या प्रेमाची अशीच फुलत राहो कातरवेळ..